Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिक्सर ऑन पब्लिक डिमांड’ सलीम दुर्रानी यांचे कर्करोगाने निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गुजरातमधील जामनगरमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 02, 2023 | 06:22 PM
former cricketer salim durani passed away indian cricketer death due to cancer at the age of 88 nrvb

former cricketer salim durani passed away indian cricketer death due to cancer at the age of 88 nrvb

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) रविवारी (२ एप्रिल) सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे (Former Indian cricketer Salim Durani passed away at the age of 88). गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar Gujarat) आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू (First Indian Cricketer) आहेत. दुर्राणी यांना १९६० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुर्रानी यांनी भारतासाठी एकूण २९ कसोटी सामने खेळले आणि या कालावधीत १२०२ धावा केल्या, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे, शिवाय ७५ बळी घेतले.

पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून सलीम दुर्रानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की दुर्राणी हे क्रिकेटचे दिग्गज आणि स्वतःमध्ये एक संस्था आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. मैदानावर आणि मैदानाबाहेरही ते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जात असत.

Salim Durani Ji had a very old and strong association with Gujarat. He played for Saurashtra and Gujarat for a few years. He also made Gujarat his home. I have had the opportunity to interact with him and was deeply impressed by his multifaceted persona. He will surely be missed. — Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023

अफगाणिस्तानात जन्मलेल्या दुर्रानी यांचे कराचीतही होते वास्तव्य

फिरकी अष्टपैलू सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी काबूल, अफगाणिस्तान येथे झाला. मात्र दुर्रानी केवळ ८ महिन्यांचे असताना त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यावर दुर्रानी यांचे कुटुंब भारतात आले.

दुर्रानी यांनी ६०-७० च्या दशकात आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दुर्रानी हे भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक तेजस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटीत त्यांनी पदार्पण केले. दुर्रानी आतिशी फलंदाजीसाठी ओळखले जात होते. यासोबतच दुर्रानी प्रेक्षकांच्या सांगण्यावरून षटकार मारण्यासाठीही प्रसिद्ध होते.

परवीन बाबीसोबत चित्रपटात केले काम

सलीम दुर्रानी यांनी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी १९७३ रोजी मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर १९७३ मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला. सलीमने ‘चरित्र’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात परवीन बाबी ही अतिशय सुंदर नायिका होती.

Web Title: Former cricketer salim durani passed away indian cricketer death due to cancer at the age of 88 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2023 | 06:19 PM

Topics:  

  • Indian Cricketer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.