India vs England: Good news for India before Manchester Test! Yorker king Jasprit Bumrah will play 'this' decisive match
India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान खेळला जाईल. या सामन्यात भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे, अन्यथा भारतीय संघाला मालिका गमवावी लागेल. हा मालिकेतील निर्णायक सामना असणारा आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी गुरुवारी (१७ जुलै) सराव सत्रानंतर याबाबट माहिती दिली. डोइशेट म्हणाले की मालिकेचा निकाल या सामन्यावर अवलंबून असणार आहे. म्हणून संघ बुमराहला खेळवण्याच्या बाजूने विचार करत आहे. ते म्हटले कि, बुमराहची शेवटच्या दोन कसोटींपैकी एका कसोटीसाठी निवड झाली आहे आणि आता हा सामना इतका महत्त्वाचा असताना त्याला मैदानात उतरवता येणार आहे.
हेही वाचा : भारतीय फुटबॉल संघाला मोठा धक्का : Aditi Chauhan चा फुटबॉलला अलविदा; १७ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवट
सोमवारी (१४ जुलै) लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला गेला. तेव्हा कर्णधार शुभमन गिलने चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेबद्दल काही एक स्पष्ट माहिती दिली नव्हती. यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये अशी बातमी प्रसारित झाली होती की, बुमराह मँचेस्टर कसोटीत खेळताना दिसणार नाही. कारण त्याचा वर्कलोड व्यवस्थापित करण्यात येत आहे.
जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराह यापूर्वीही वर्कलोड व्यवस्थापनाच्या कारणाने या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्यावेळी असे वाटत होते की बुमराह ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत पुनरागमन करणार आहे.
हेडिंग्लेतील लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने भारतीय गोलंदाजीची धुरा वाहिली होती. त्याने त्या दरम्यान २४.४ षटकांत ८४ धावांत ५ बळी टिपले होते. त्याला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता अली नव्हती. ज्यामुळे भारताला पाच विकेटनी पराभव पत्करावा लागला होता. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने पुन्हा एकदा पाच विकेट (२७ षटकांत ७४ धावांत ५ बळी) घेण्याची किमया साधली. तर दुसऱ्या डावात ३८ धावांत दोन विकेट काढल्या. पण, इंग्लंडमधील लीड्सप्रमाणे भारताला लॉर्ड्समध्येही पराभवाचे तोंड बघावे लागले.
हेही वाचा : Bangalore stampede : ‘पोलिस RCB च्या नोकरांसारखे वागले..’, कर्नाटक सरकारची उच्च न्यायालयात खळबळजनक माहिती