GT vs CSK: 'I'm not saying I'll come back...', Captain Total MS Dhoni hints at retirement from IPL? Statement in last match in discussion..
Ms Dhoni Retirement IPL : आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ च्या प्रवासाचा शेवट गोड केला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. ब्रेवीस आणि कॉनवे या जोडीच्या अर्धशतकांच्या जोरवार चेन्नई २०० ला आकडा पार करता आला. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावात गारद झाला. काल चेन्नई सुपर किंग्ज या हंगामातील शेवटचा सामना खेळला. चेन्नईसाठी हा हंगाम खूप खराब गेला आहे. या विजयानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या निवृत्तीवर भाष्य केले.
सामना संपल्यानंतर चाहते धोनीची सर्वात जास्त वाट पाहत असल्याचे दिसून आले होते. ते धोनी काय बोलतो हे ऐकण्यासाठी उत्सुक दिसत होते. सामना जिंकल्यानंतर, सादरीकरण समारंभात, हर्ष भोगले यांनी धोनीला त्याच्या पुढील हंगामाबद्दल विचारणा केली. तेव्हा धोनीने त्याच्या खास शैलीत त्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
हर्षा भोगले यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना धोनी म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असून मी रांचीला घरी जाईन. मी बराच काळ घरी गेलेलो नाही. मी परत येईन असे म्हणत नाही, मी परत येणार नाही असे देखील म्हणत नाही. निर्णय घेण्याची घाई करण्याची गरज नाही.” असे उत्तर धोनीने दिले.
१७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्जकडून जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धही आयुषने संघाला चांगली सुरुवात करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या सामन्यात आयुषने २०० च्या स्ट्राईक रेटने ३४ धावा केल्या आहेत. यानंतर उर्विल पटेलने देखील संघाच्या धाव फलकाला गती निर्माण करून दिली. त्याने १९ चेंडूंचा सामना करत जलद ३७ धावा केल्या. या दोघांमुळे संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्यास यशस्वी ठरला.
हेही वाचा : KKR vs SRH : केकेआरसाठी Sunil Narine ने रचला विश्वविक्रम! असा भीम पराक्रम करणारा बनला जगातील पहिला गोलंदाज..
आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल यांच्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जकडून देवाल्ड ब्रेव्हिस देखील मागे न राहता त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. डेवाल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूत आपले अर्धशतक साकाराले. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. याशिवाय, डेव्हॉन कॉनवेनेही देखील शानदार खेळी केली. त्याने ३५ चेंडूंत ५२ धावा केल्या.