
WPL 2026: A major blow for Gujarat Giants! This Indian star player is out of the season; what is the reason?
Yastika Bhatia is out of the WPL : गुजरात जायंट्सला महिला प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामाच्या सुरुवातीलाच धक्का बसला आहे. त्यांची स्टार खेळाडू यष्टिका भाटिया महिला प्रीमियर लीग 2026 मधून बाहेर पडली आहे. फ्रँचायझीने 10 जानेवारी रोजी अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला आहे. भाटियाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ACL शस्त्रक्रिया केली होती, ज्यामुळे या हंगामासाठी तिच्या उपलब्धतेबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती. अखेर,आता ती स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तथापि, भाटियाच्या जागी अद्याप कोणत्याही बदलीची घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : कोणी केली ‘गब्बर’ ची शिकार? ‘हा’ क्रिकेटपटू पुन्हा चढणार बोहल्यावर! वाचा संपूर्ण प्रेमकहाणी
यष्टिका भाटिया ही पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील ती नवी मुंबई येथे संघात सामील झाली आहे. ती स्टँडवरून तिच्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवत आहे. गुजरात जायंट्सचे प्रशिक्षक मायकेल क्लिंगर म्हणाले की, “आशा आहे की तुम्ही चांगले करत असाल आणि तुमची प्रकृती चांगली होत आहे. आम्ही तुम्हाला तंदुरुस्त आणि मजबूत पाहण्याची आणि WPL सीझन 5 मध्ये संघाचा भाग असल्याचे पाहण्यासाठीची उत्सुकता बाळगत आहोत.”
बीसीसीआयकडून लिलावापूर्वी भाटियाच्या अनुपस्थितीबद्दल सर्व फ्रँचायझींना माहिती देण्यात आली होती. परिणामी, आता संघाला बदली खेळाडू घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे असून देखील, गुजरात जायंट्सने तिला लिलावात ₹५० लाखांना खरेदी करून आपल्या संघात घेतले होते. भाटिया या हंगामातील मोठ्या कालावधीसाठी अनुपलब्ध राहणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सामील झाली आहे. यूपी वॉरियर्सची प्रतिका रावल आणि आरसीबीची पूजा वस्त्राकरसारखे खेळाडू देखील दुखापतीमुळे या स्पर्धेत अनूउपलब्ध आहेत.
पहिल्या तीन हंगामामध्ये भाटियाने मुंबई इंडियन्ससाठी शानदार कामागीरी केली आहे. तिने २८ सामन्यांमध्ये ११३.४५ च्या स्ट्राईक रेटने ५०६ धावा केल्या आणि हेली मॅथ्यूजसोबत स्पर्धेतील सर्वात धोकादायक सलामी भागीदारींपैकी एक केली होती. शिवाय, ती दोन वेळा डब्ल्यूपीएल विजेत्या संघाचा भाग देखील राहिली आहे.
हेही वाचा : Vijay hazare trophy 2025 : देवदत्त पडिक्कलने घडवला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला
गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ: ॲशले गार्डनर, बेथ मुनी, सोफी डेव्हाईन (विदेशी), रेणुका सिंग, भारती फुलमाली, तितास साधू, अनुष्का शर्मा, तनुजा कंवर, काश्वी गौतम, किम गर्थ, जॉर्जिया वेरेहम, हॅप्पी कुमारी,आयुषी सोनी, शिवानी सिंग, डब्लू राजेश्वरी, गौतम, दानिश्वा.