WPL 2026: क्रिकबझच्या अहवालानुसार, WPL 2026 हंगाम ७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.
२०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. लिलावापूर्वी, पाचही संघांनी त्यांच्या रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. WPL इतिहासातील हा पहिलाच मेगा लिलाव असेल.
अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणि क्रांती गौर सारख्या खेळाडूंनाही रिलीज केले आहे, ज्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये सामनावीर होत्या. दीप्तीच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात शेवटच्या स्थानावर राहिले.
फ्रँचायझींनी अनेक स्टार खेळाडूंना कायम ठेवले आहे तर काहींना सोडून देण्यात आले आहे. भारताच्या चार स्टार खेळाडू, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा, त्यांच्या संबंधित संघांसह राहतील.