कॅन्डीडेट चेस टूर्नामेंट : भारताच्या डी गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. या विजयासह गुकेश (Gukesh) उमेदवार बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक चॅम्पियनला आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या विजयासह भारतीय स्टारने 40 वर्षे जुना विक्रम मोडला. चेन्नईच्या या युवा बुद्धिबळपटूने कास्पारोव्हच्या विक्रमात बरीच सुधारणा केली. आता गुकेशला या वर्षाच्या अखेरीस चीनच्या विद्यमान विश्वचषक विजेत्या डिंग लिरिनविरुद्ध (Ding Liren) खेळण्याची संधी मिळणार आहे.
सर्वात कमी वयात उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्हच्या नावावर होता, जो 1984 मध्ये आपल्याच देशाच्या नतोली कार्पोव्हला आव्हान देण्यासाठी पात्र ठरला होता. त्यावेळी कास्परोव्ह 22 वर्षांचा होता. पण आता गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. टूर्नामेंट जिंकण्याबरोबरच गुकेशने 88,500 युरो (अंदाजे 78.5 लाख रुपये) चे रोख बक्षीसही जिंकले. उमेदवारांसाठी एकूण बक्षीस रक्कम 5,00,000 युरो होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा ग्रेट विश्वनाथन आनंदनंतर गुकेश दुसरा भारतीय ठरला. पाच वेळा विश्वविजेता आनंदचा विजय 2014 मध्ये आला होता.
विजयी झाल्यानंतर काय म्हणाला गुकेश?
विजयानंतर गुकेश म्हणाला की, ‘खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्या खेळाचे देखील अनुसरण करत होतो. त्यानंतर मी ग्रेगॉर्ज गजेव्स्की या दुसऱ्या खेळाडूशी बोललो, मला वाटते की त्याचा फायदा मला झाला.
विश्वनाथन आनंद यांची X’ वर पोस्ट
आनंदने ‘X’ वर पोस्ट केले, ‘सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. वाका चेस कुटुंबाला तुम्ही जे काही साध्य केले त्याचा अभिमान वाटतो. तुम्ही ज्या प्रकारे खेळलात आणि कठीण प्रसंग हाताळलेत त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घ्या.’
Congratulations to @DGukesh for becoming the youngest challenger. The @WacaChess family is so proud of what you have done . I’m personally very proud of how you played and handled tough situations. Enjoy the moment
— Viswanathan Anand (@vishy64theking) April 22, 2024