गुरप्रीत सिंह संधू : भारताच्या संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर त्याने भारत विरुद्ध कुवेत यांच्यामधील शेवटचा सामना ६ जून रोजी खेळला. नुकतीच भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा नवा कर्णधार कतार विरुद्ध 2026 फिफा विश्वचषक पात्रता सामन्यापासून संघाची जबाबदारी स्वीकारेल आणि हा सामना मंगळवार, 11 जून रोजी होणार आहे. आता संघाची कमान गुरप्रीत सिंग संधूकडे सोपवण्यात आली असून तो भारतीय संघाचा गोलरक्षकही आहे.
[read_also content=”सचिनपासून सेहवागपर्यंत, भारताच्या विजयावर दिग्गजांनी सोशल मीडियावर केला आनंद व्यक्त https://www.navarashtra.com/sports/from-sachin-to-sehwag-legends-took-to-social-media-to-celebrate-india-victory-545565.html”]
भारतीय फुटबॉल संघाचा पुढील सामना कतारविरुद्ध रंगणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. भारताला मंगळवारी ११ जून रोजी जस्सिम बिन हमाद स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ शनिवारी ८ जून रोजी रात्री दोहाला पोहोचला. हा सामना जिंकून भारतीय फुटबॉल संघ प्रथमच विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करू शकतो. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतरचा पहिला सामना असणार आहे. त्यामुळे आता फुटबॉल चाहत्यांच्या नजरा गुरप्रीत सिंग संधूकडे असणार आहेत.
भारताचे फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीमॅक यांनी गुरप्रीत सिंग संधूच्या कर्णधार पदावर म्हंटले की, भारतीय फुटबॉल संघाचा गुरप्रीत हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणे अवघड काम नव्हते. गुरप्रीतने त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यत ७१ सामाने खेळले आहेत. गेल्या ५ वर्षांत गुरप्रीतने सुनील आणि संदेशसोबत काही सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे तो स्वाभाविकपणे त्याला पात्र होता, असे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी सांगितले.
प्रशिक्षक स्टिमॅक यांनी कतारविरुद्धच्या सांगितले की, भारताचा पराभव झाला तर हा संघ विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यातील पात्रता फेरीतून बाहेर पडेल. भारत पाच गुणांसह कतारनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान पाच गुणांसह तिसऱ्या तर कुवेत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सध्या कतार आघाडीवर आहे.