'I was very shocked to hear this...', Harbhajan Singh's emotional reaction on Ahmedabad plane crash..
Harbhajan Singh’s reaction on Ahmedabad plane crash : गुरुवार १२ मे रोजी गुजरातच्या अहमदाबादमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी असलेले विमान अचानक कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही घटना घडलिया आहे. या दरम्यान १३३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असता टेक ऑफ नंतरच हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेनंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने देखील या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार..
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे ऐकून मला खूप धक्का बसला. या दुःखद वेदना आणि नुकसानातून जात असलेल्या सर्व पीडितांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. अशा वेळी शब्द कमी पडतात, परंतु मला विश्वास आहे की, की पीडितांना शक्ती, धैर्य आणि धैर्य मिळेल. या दुर्घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना.” अशा शब्दात हरभजन सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
I am utterly shocked and deeply anguished to learn about the tragic Air India plane crash in Ahmedabad. My thoughts and prayers go out to all the victims and their families who are enduring unimaginable pain and loss. In moments like these, words feel so inadequate, but I hope…
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 12, 2025
या दुःखद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. प्रत्येक वेळी अशा आपघातावेळी प्रश्न असतो की अपघात का झाला असावा? हे रहस्य उलगडण्यात “ब्लॅक बॉक्स” महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ब्लॅक बॉक्स हे एक असे उपकरण आहे जे विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती रेकॉर्ड करत असते.
हेही वाचा : WTC Final : मिचेल स्टार्कने रचला इतिहास; मोहम्मद शमीचा विक्रम मोडून दिला मोठा झटका..
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये घटनास्थळी जळणारे कचरा आणि गोंधळ दिसून येत आहे. प्राथमिक अहवालांनुसार, या घटनेत १३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे सात पथके आणि अनेक रुग्णवाहिका मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या असून युद्ध पातळीवर बचावाचे काम सुरू आहे. अहवालांनुसार, विमानाने अपघातापूर्वी ‘मेडे कॉल’ पाठवला होता, ज्यावरून असे समजून येत आहे की, पायलटला विमानात गंभीर तांत्रिक बिघाड आढळला होता.