वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi’s strong batting : आयपीएल २०२५ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक झंझावाती खेळी केली. इंग्लंडला जाण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या ९० चेंडूत १९० धावांची वादळी खेळी केली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली. भारताचा अंडर-१९ संघ येत्या २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. याशिवाय, भारतीय संघ ५० षटकांचा एक सराव सामना देखील खेळला जाणार आहे. वैभव सूर्यवंशी आयुष म्हात्रेसोबत अंडर-१९ संघात ओपनिंग करणार आहे.
एनसीएमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने तीच शैली दाखवून दिली आहे. ज्यासाठी त्याने आपली ओळख मिळवली. खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात वैभवने लॉग ऑन आणि मिडविकेटवर लांब-लांब षटकार मारले. त्याच्या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशी वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वांत कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. परंतु, आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने दमदार शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३८ चेंडूचा सामना करत १०१ धावा केल्या, त्याचे शतक हे केवळ ३५ चेंडूमध्ये आले आहे. त्यामध्ये त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली. राजस्थानने हा सामना १६ व्या षटकातच आपल्या नावे केला.
हेही वाचा : इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलमचे भारतीय संघाला चॅलेंज! भारताने चांगली तयारी केली असेल, पण…
आयपीएलमध्ये वैभवने आपली वेगळी छाप पाडली आहे. अवघ्या ३५ चेंडूंतच धमाकेदार शतक झळकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला होता. रायस्थान रॉयल्सने त्याला १ कोटी आणि १० लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट करून घेतले होते. आयपीएलच्या सात सामन्यांत त्याने २५२ धावा केल्या आहेत. आता पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीने आपली दाखल सर्वांना घ्यायला भाग पडले आहे.