Hardik Pandya
IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्या आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात जखमी झाला. यानंतर तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हार्दिक मैदानात परतणार होता. मात्र, फिटनेसवर काम करत असताना त्याला पुन्हा दुखापत झाली, त्यामुळे तो अजूनही क्रिकेटपासून दूर आहे. आता एका नवीन वृत्तानुसार, हार्दिकची दुखापत अधिक गंभीर असल्याचे सांगतिले जात आहे. त्यामुळे पांड्या आता दीर्घ काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, स्टार खेळाडू हार्दिक पांड्या तीन आठवड्यांनंतरच मैदानावर धावण्यास सुरुवात करू शकेल. त्यानंतर, पुढील आठ आठवड्यांमध्ये त्याच्या रनिंग लोड हळूहळू वाढवला जाईल. पांड्याला पूर्ण तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी बराच वेळ लागेल. पांड्या त्याच्या पोटरीच्या आतील भागाला झालेल्या स्ट्रेस इंज्युरीने त्रस्त आहे. यामुळेच तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बराच काळ घालवत आहे. पांड्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या फिटनेसवर काम करण्यास सुरुवाच करेल. परंतु, भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. पांड्या कसोटी संघाचा भाग नाही, त्यामुळे तो थेट २०२७ च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
हार्दिक पांड्या या हंगामात देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही. पांड्या तंदुरुस्त होईपर्यंत विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संपलेल्या असतील. परिणामी, पांड्याला थेट आयपीएल २०२७ च्या आव्हानात्मक खेळाला सामोरे जावे लागेल. बीसीसीआय सध्या पांड्याबाबत कोणतीही घाई करत नाहीये, म्हणूनच त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ दिला जात आहे.
२०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याची गरज आहे. त्यामुळे, ती स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघ त्याला पूर्ण वेळ देत आहे. सध्या, संघ व्यवस्थापन पांड्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. त्यामुळे, नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे यांना पूर्ण संधी दिली जात आहे. याच कारणामुळे, नितीश कुमार रेड्डीला न्यूझीलंड दौऱ्यावर अंतिम ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.






