Ind-Pak war: 'I and my family are with the army..', Pakistani Arshad Nadeem's statement about Neeraj Chopra is in discussion..
Ind-Pak war : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्याचे दिसत आहे. याचा दोन्ही देशातील खेळावर देखील झाला आहे. अशातच ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमने त्याचा प्रतिस्पर्धी आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता राहीलेला भारताचा नीरज चोप्रा याबद्दल बोलण्यास नकार दर्शवला आहे. नुकत्याच संपलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला आमंत्रित केल्याबद्दल चोप्राला आपल्याच देशात ट्रोल करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यापूर्वी नीरजकडून पाकिस्तानी भालाफेकपटूला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
गुरुवारी माध्यमांशी बोलत असताना नदीमने नीरज चोप्रा आणि भारतासोबत सुरू असलेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. नदीम म्हणाला की, भारतासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे मी नीरजबद्दल कोणती देखील टिप्पणी करू इच्छित नाही. तसेच नदीम पुढे म्हणाला की, ‘मी एका गावातील आहे आणि मी फक्त एवढेच म्हणेन की मी आणि माझे कुटुंब नेहमीच आमच्या सैन्यासोबत उभे असणार आहोत. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा हा नदीमच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. नदीमने पहिला क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावलं होतं.
पुढे नदीम म्हणाला की, मी नेहमीच म्हणत आलो आहे की मी नेहमीच स्वतःशी स्पर्धा करतो आणि माझे ध्येय एके दिवशी १०० मीटरचा टप्पा ओलांडणे आहे. तो म्हणाला की जर चोप्रा चांगली कामगिरी करत असेल तर ते त्याच्यासाठी चांगले आहे. चोप्राने अलीकडेच डायमंड लीग स्पर्धेच्या दोहा लेगमध्ये ९०.२३ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम फेकसह ९० मीटरचा टप्पा ओलांडून रौप्य पदकाची कमाई केली.
हेही वाचा : SRH vs RCB : आरसीबीची अव्वल स्थानावर नजर! एसआरएचसमोर आज प्लेऑफमधील बंगळुरूचे आव्हान..
टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या चोप्राने १५ मे रोजी डायमंड लीग स्पर्धेच्या दोहा लेगपूर्वी प्रतिक्रिया दिली होती की, तो आणि नदीम कधीही जवळचे मित्र नव्हते. नीरजच्या नावावर असलेली एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धा २४ मे रोजी बेंगळुरू येथे पार पडणार होती, परंतु पाकिस्तानसोबतच्या वाढत्या लष्करी संघर्षामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.