ऋषभ पंत(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ६४ सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगामा शेवटच्या टप्प्यात आला आहे. या संपूर्ण स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप चर्चेत राहिला. त्याचे कारण म्हणजे त्याचा फॉर्म. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. संघाचा कर्णधार ऋषभ पंतची कामगिरी खूप वाईट झाली आहे. यावर्षी ऋषभ पंतचे कर्णधारपद देखील खराब राहिले आहे. पंतची फलंदाजी ही या स्पर्धेत चिंतेची बाब ठरली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर चाहते पंतला खूप ट्रोल करताना दिसत आहे.
आता या सर्व प्रकारावर एलएसजीच्या कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतने या प्रकाराला बनावट बातम्यांचा अजेंडा असे म्हटले आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात एलएसजीने ऋषभ पंतला २७ कोटींच्या मोठ्या बोलीने खरेदी केले होते. त्यानंतर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
क्रिकेटप्रेमी आणि फ्रँचायझीला या अपेक्षा होती की ऋषभ पंत चालू हंगामात आपल्या बॅटने चांगली कामगिरी करेल. पण असे प्रत्यक्षात मात्र काही घडले नाही. लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच आल्या नाहीत. त्यानंतर एका पत्रकाराने सोशल मीडियावर लिहिले की, त्याला पुढील वर्षी लखनौ सुपर जायंट्समधून सोडण्यात येणार, कारण २७ कोटी रुपयांची रक्कम खूप जास्त आहे. या पोस्टला उत्तर देताना कर्णधार पंतने आपली प्रतिक्रिया दिली.
I understand fake News gives more traction To content but let’s not built everything around it . Little sense and credible news will help more rather making fake news with agenda . Thanks have a good day . Let’s be responsible and sensible what we put out on social media 🇮🇳🙏🏻
— Rishabh Pant (@RishabhPant17) May 22, 2025
पत्रकाराने शेअर केलेल्या एका पोस्टवर ऋषभ पंत संतपलेला दिसून आला. त्याने उत्तर दिले की, “मी सहमत आहे की बनावट बातम्यांमुळे मजकुराची पोहोच अधिक असते, परंतु ती सर्वस्व मानली जाऊ नये. अजेंडा असलेल्या बनावट बातम्यांऐवजी, थोडीशी समजूतदार आणि योग्य बातमी चांगली असेल. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ जावो. सोशल मीडियावर तुम्ही जे काही पोस्ट कराल त्याबाबत थोडे जबाबदार आणि समजूतदार व्हा.”
लखनौ सुपर जायंट्सने या हंगामात एकूण १३ सामने खेळले आहेत. आता त्यांना आणखी एक सामना खेळायचा आहे. पण त्याआधीच संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. उर्वरित एक सामना आता केवळ संघासाठी फक्त एक औपचारिकता असणार आहे. जर आपण कर्णधार ऋषभ पंतबद्दल सांगायचे झाले तर त्याने या हंगामात १२ डावांमध्ये फक्त १५१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक अर्धशतकाचा देखील समावेश आहे.
हेही वाचा : PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप…
२०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतची सरासरी १२.२७ इतकी आहे. आयपीएलमधील एका हंगामात कोणत्याही कर्णधाराची ही सरासरी दुसरी सर्वात वाईट सरासरी ठरली आहे. २०२१ च्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनची सरासरी ११.०८ इतकी होती आणि दुसऱ्या नंबरवर ऋषभ पंतचे नाव घ्यावे लागते.