फोटो सौजन्य - X
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना हा इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्स क्रिकेट मॅच स्टेडियममध्ये खेळविली जाणार आहे. शेवटच्या फायनलचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन मजबूत संघ एकमेकांसमोर असणार आहेत. या फायनलच्या कसोटी सामन्याला 11 जून पासून सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व हे टेंबा बावुमा करणार आहे तर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पद हे पॅट कमिन्सच्या हाती असणार आहे.
आता आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये फायनलच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे ते म्हणजेच सामन्यांमध्ये असणारे पंच. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्यामध्ये भारत हा या सामन्याचा भाग नसणार आहे कारण संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला जे दोन संघ पहिल्या दोन स्थानावर फिनिश करतात ते संघ फायनल सामना खेळतात.
IPL 2025 Final : एका क्लिक पाहा प्लेऑफ आणि फायनलच्या तिकिटांची सविस्तर माहिती!
आयसीसीने अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये जवागल श्रीनाथ आणि नितीन मेनन या दोन भारतीयांची नावे आहेत. या सामन्यासाठी माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना सामनाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर अनुभवी पंच नितीन मेनन यांना चौथ्या पंचाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ICC World Test Championship Final | Match Officials South Africa vs Australia | 11-16 June | Lord’s On Field Umpires: Chris Gaffaney, Richard Illingworth
TV Umpire – Richard Kettleborough
Fourth Umpire: Nitin Menon
Referee: Javagal Srinath#WTC25 #ICCWTC #wtcfinal pic.twitter.com/nyaAqlUEFU — 𝐙𝐞𝐞𝐬𝐡𝐚𝐧 𝐍𝐚𝐢𝐲𝐞𝐫 𝐈 ذیشان 𝐈 ज़ीशान 2.0 (@zeeshan_naiyer2) May 23, 2025
जवागल श्रीनाथ हे बऱ्याच काळापासून आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम करत आहेत. तो २००६ पासून ही भूमिका बजावत आहे आणि आतापर्यंत ७९ कसोटी सामन्यांमध्ये पंचाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा WTC फायनल पंच म्हणून त्याच्या कारकिर्दीतील ८० वा कसोटी सामना असेल. दुसरीकडे, नितीन मेनन हे आंतरराष्ट्रीय पंचगिरीतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी अनेक मोठ्या सामन्यांमध्ये आपली भूमिका बजावली आहे. अशाप्रकारे, टीम इंडिया अंतिम फेरीत खेळत नसली तरी, या मोठ्या सामन्यात दोन भारतीय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील ही भारतीय चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.