ICC begins brainstorming for LA 28 cricket tournament! Qualifying will be final with format
Olympics 2028 : आयसीसीकडून लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ साठी काम सुरू करण्यात आले आहे. आयसीसी लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ साठी एक नवीन कार्यगट तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जो जगातील महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहे. शुक्रवारी सिंगापूरमध्ये पार पडलेल्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. आयसीसीचे नवे सीईओ संजोग गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या पदाच्या औपचारिक भूमिकेत भाग घेतला होता.
या कार्यगटाचे मुख्य उद्दिष्ट हे असणार की, क्रिकेटच्या विविध स्वरूपांची रचना आणि २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रियेत सुधारणा करणे. या गटाची स्थापना लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.तसेच शनिवारी म्हणजेच आज होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत ते अंतिम करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा कोणी केल्या? टॉप-5 मध्ये 4 भारतीय
या गटामध्ये सीईसी आणि बोर्डाचे सदस्य असणारा आहेत. तसेच त्यांना लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रता पद्धतीबद्दल सांगण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. आयसीसीचे बहुतेक सदस्य आणि प्रमुख लोक असे बोलतात की, संघांची निवड रँकिंगच्या आधारे करण्यात यावे. परंतु, आयसीसीने हा मुद्दा कार्यगटावर सोडण्यात आला आहे.
यामध्ये काही सदस्य पात्रता स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने असले तरी वेळेअभावी आणि भविष्यातील व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकामुळे हा पर्याय व्यावहारिक असल्याचे मानले जात नाही. आयसीसीकडून सर्व संभाव्य पर्यायांची चाचपणी करण्याचे निर्देश कार्यगटाला दिले आहेत. जर रँकिंगच्या आधारे संघांची निवड करण्याची शिफारस करण्यात आली तर रँकिंगची कट-ऑफ तारीख काय असेल याची देखील निश्चिती करावी लागणार आहे.
एलए२८ ऑलिंपिकमध्ये फक्त ६ पुरुष आणि ६ महिला क्रिकेट संघांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे निवड प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होणार आहे. बैठकीत टी२०, एकदिवसीय आणि कसोटी स्वरूपातील कोणत्याही मोठ्या बदलांवर थेट चर्चा करण्यात आलेली नाही. परंतु असे मानले जात आहे कि, कार्यगट विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये काही सुधारणा किंवा बदल आवश्यक आहेत का? याबाबत याचे मूल्यांकन करणार आहे.
तसेच एकदिवसीय आणि टी२० स्वरूपांचा आढावा देखील शक्यय असणार आहे.
बैठकीत अस देखील निर्णय घेतले गेले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी किमान वयोमर्यादा १५ वर्षे असणार आहे. हा निर्णय आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीच्या शिफारशींनुसार होणार आहे. तथापि, विशेष परिस्थितीत वयोमर्यादा शिथिल केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पाकिस्तानी खेळाडूंची जुनी सवय! आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा केलं अपमानास्पद, अशा प्रकारे झाले धावबाद