पुढील महिन्यात ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका यांच्यातील सलामी सामन्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरच्यामते मुंबईमध्ये खेळणे भावनिक असणार आहे.
बांगलादेश सरकारने सुरक्षेच्या मुद्द्यांवर पाकिस्तानकडे मदत मागितली होती, त्यानंतर पाकिस्तानने ही भूमिका स्वीकारली आहे. आता पाकिस्तानने या प्रकरणात बांगलादेशला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. आयसीसीने आता बांगलादेशला यासंदर्भात अंतिम मुदत दिली आहे. आयसीसीने २१ जानेवारीपर्यंत बांगलादेश टी-२० विश्वचषकात सहभागी होईल की नाही हे ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी व्हिसा औपचारिकता सुलभ करण्यासाठी पावले उचलली आहेत.
आयसीसीला बांगलादेशकडून त्यांच्या गट क ऐवजी गट ब मध्ये स्थान देण्याची आणि त्यांना आयर्लंडच्या जागी स्थान देण्याची विनंती मिळाली आहे, जेणेकरून बांगलादेश त्यांचे सर्व गट स्टेज सामने श्रीलंकेत खेळू शकेल.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना बांगलादेशने भारतीय वंशाच्या आयसीसी अधिकाऱ्याला व्हिसा नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे.
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. खेळाडूंनी २०२५-२६ बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकला आहे. सामन्यांपूर्वी खेळाडू स्टेडियमवर पोहोचलेही नाहीत, ज्यामुळे बोर्ड कठीण परिस्थितीत सापडले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल इस्लाम यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या क्रिकेटपटूंनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर क्रिकेटवर बहिष्कार टाकतील.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने त्याला मुस्तफिजूरच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारला. प्रश्नाने चिडून, नबीने स्पष्टपणे विचारले की त्याचा त्याच्याशी काय संबंध आहे. नबीने स्पष्टपणे भाष्य करण्यास नकार दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला योग्य उत्तर मिळाले आहे. आयसीसीने म्हटले आहे की भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या संघातून काढून टाकल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड संतप्त झाले. आता, त्यांच्या देशाला आणि क्रिकेट बोर्डाला आणखी एक मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
पीसीबीने बांगलादेशच्या टी२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यांचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि 'राष्ट्रीय अपमान' म्हणून बीसीबी भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
भारत आणि श्रीलंका टी२० विश्वचषक आयोजित करत आहेत. बीसीबीला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवायचे आहेत. असे दिसते की बांगलादेशची मागणी पूर्ण होणार नाही आणि आयसीसीने एक नवीन योजना आखली आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये लोकांचा रस कमी होत असल्याचे मत भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने व्यक्त केले आहे. तसेच या स्पर्धेमधील चमक कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय दृष्टिकोनातून बदल आवश्यक असल्याचे त्याने म्हटले आहे.
रोहित शर्मा आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह एका कार्यक्रमात होते. जय शाह स्टेजवर बोलत होते आणि नंतर रोहितला संबोधित करताना त्यांनी हिटमॅनला भारतीय कर्णधार म्हटले. आता सध्या तो व्हिडिओ सोशल…
बीसीबी गुरुवारी पुन्हा एकदा आयसीसी औपचारिक पत्र पाठवून टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता स्पष्ट केल्या आहेत आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण बनवण्याची मागणी केली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यामधील वाद चिघळत चालला आहे, वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यांच्याशी झालेल्या वादानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने औपचारिकपणे स्थळ बदलण्याची विनंती केली तेव्हा हे प्रकरण आणखी वाढले.
आयसीसीकडून बांगलादेशला २०२६ चा टी२० विश्वचषक सुरळीत पार पडेल असे आश्वासन देण्यात आले आहे. बीसीबीने सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी आयसीसीसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे.
बांगलादेशने आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. या प्रकरणाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे बांगलादेश संघ त्यांचे सर्व सामने भारतात खेळू शकतो.