फोटो सौजन्य – X
पाकिस्तान विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा सामना पार पडला. या सामन्यात विजय मिळवुन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. या स्पर्धेचे आयोजन इंग्लडमध्ये करण्यात आले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 20 जुलै रोजी सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, मोहम्मद हाफीजच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्सचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान, पाकिस्तान संघ पुन्हा एकदा लाजिरवाणा झाला आहे. पाकिस्तानच्या डावात, फलंदाज उमर अमीनच्या धावबादने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
१९ जुलै रोजी, एजबॅस्टन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या पहिल्या सामन्यात, उमर इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध मोहम्मद हाफीजसोबत झालेल्या गैरसमजामुळे धावबाद झाला. पाकिस्तानच्या डावाच्या ८ व्या षटकात, मोहम्मद हाफिजने दिमित्री मस्कारेनहासविरुद्ध विकेटच्या मागे शॉट मारून धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट फिल्डरच्या हातात जात असल्याचे पाहून त्याने आपला विचार बदलला.
— Billy Bowden (@billybowdenn) July 18, 2025
दरम्यान, नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला उमर अमीन त्याच्या अगदी जवळ आला होता. हाफिजच्या नकारानंतर तो परतला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उमर ९ चेंडूत फक्त ६ धावा करू शकला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान चॅम्पियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १६० धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद हाफिजने सर्वाधिक ५४ धावा केल्या. तो १७ व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय, यामीनने १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. इंग्लंड चॅम्पियन्सकडून ट्रेमलेट आणि प्लकेटने २-२ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात, इंग्लंड चॅम्पियन संघाला निर्धारित २० षटकांत तीन गडी गमावून केवळ १५५ धावा करता आल्या. इंग्लंडकडून फिल मस्टर्डने ५१ चेंडूत ५८ धावा आणि इयान बेलने ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. कर्णधार इऑन मॉर्गन १२ चेंडूत १६ धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानकडून रईस, तन्वीर आणि यामिनने १-१ बळी घेतले. पाकिस्तानचा पुढील सामना १९ जुलै रोजी भारत चॅम्पियनविरुद्ध होईल.