ICC Women's World Cup 2025: Australia sets Pakistan a target of 222 runs! Beth Mooney's brilliant century
ICC Women World Cup 2025 : महिला विश्वचषक २०२५ च्या नवव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमनेसामने उभे ठाकले आहेत. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर या दोन संघात लढत सुरू आहे. नाणेफेक गमावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत बेथ मुनीच्या शतकाच्या पाकिस्तान महिला संघासमोर २२२ धावांचे लक्ष्य उभे केले. आता पाकीस्तानला विजय मिळवण्यासाठी २२२ धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा : ताजी ICC Test Rankings जाहीर! टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला फटका! जोचे अव्वल ‘रूट’ कायम
ऑस्ट्रेलिया महिला संघ अडचणीत सापडला असताना बेथ मुनीने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची भूमिका बजावत शतक झळकावले. तिने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक ठोकून आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. मुनीने ११४ चेंडूचा सामना करत १०९ धावा केल्या, ज्यात तिने ११ चौकार मारले. तिच्या या खेळीने तिने संघाला संकटातून बाहेर काढले.
मुनीच्या खेळीने ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत झाली असून संघ आता जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. मुनीने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर ती बाद झाली असली तरी याने पुन्हा एकदा तिची खिलाडूवृत्ती आणि क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. चाहते आणि क्रिकेट विश्लेषकांना ही खेळी दीर्घकाळ लक्षात राहणारी आहे.
मुनीने चौथ्या क्रमांकावर येऊन ऑस्ट्रेलियाला ७ बाद ७६ धावांच्या अनिश्चिततेतून बाहेर काढून ९ बाद २२१ धावांपर्यंत पोहोचवले. दहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या अलाना किंगसोबत नवव्या विकेटसाठी तिने केलेली १०६ धावांची भागीदारी खूप महत्त्वाची ठरली. अलाना ४९ चेंडूत नाबाद ५१ धावांवर नाबाद राहिली, त्यात तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. मुनीने किम गार्थ (११) सोबत आठव्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. २१.२ षटकांत एक वेळ ७६ धावांत ७ विकेट गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ९ विकेट गमावून २२१ धावा उभ्या केल्या.
हेही वाचा : टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचे पुनरागमन नाहीच! ‘या’ माजी खेळाडूचे खळबळजनक विधान चर्चेत
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने आपली सुरवात शानदार केली खरी मात्र पाकिस्तानी गोलंदाज बेथ मूनी आणि अलाना किंग यांच्या विकेट घेण्यात यशस्वी ठरू शकले नाहीत. परिणामी ऑस्ट्रेलियाने २२१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. २२२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असण्याची शक्यता आहे कारण समोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ आहे. पाकिस्तानकडून नशरा संधूने ३, कर्णधार फातिमा सना आणि रमीन शमीमने प्रत्येकी २ आणि डायना बेग आणि सादिया इक्बालने प्रत्येकी १ बळी टिपला.