यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
ICC Test Rankings : आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. यावेळी, बऱ्याच काळानंतर, अव्वल स्थानांवर काही एक हालचाल झाल्याचे दिसून आले नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने ही नवीन रँकिंग जाहीर केली गेली आहे. पहिल्या कसोटीत भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालची बॅट काही चालली नाही, ज्यामुळे त्याच्या रँकिंगवर मोठा परिणाम दिसून आला आहे. टॉप १० मध्ये मोठे बदल झालेले नसले तरी, काही खेळाडूंनी त्यांच्या स्थानात सुधारणा केली आहे.
हेही वाचा : ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने पुन्हा एकदा आपली जादू कायम राखत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान जपले आहे. त्याचे रेटिंग सध्या ९०८ ९ इतके आहे. आयसीसी रँकिंग २ ऑक्टोबरपर्यंतच्या डेटाच्या आधारे जाहीर केली गेली आहे. त्यामुळे असे मानले जाते की त्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील सर्व नवीनतम कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही. असे असून देखील रूटने त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
जो रूट नंतर त्याचा सहकारी हॅरी ब्रूक हा देखील८६८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडच्या या दोन फलंदाजांनंतर, न्यूझीलंडचा स्टार केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर असून त्याचे रेटिंग ८५० वर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८१६ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
बावुमा आणि मेंडिसला जोडीला मोठा फायदा
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला यावेळी क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले आहे. तो एका स्थानाने पुढे जाऊन ५ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता ७९० आहे. श्रीलंकेचा कामेंदु मेंडिसला देखील एका स्थानाचा फायदा होऊन आता ७८१ गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. अलिकडच्या सामन्यांमध्ये सातत्याने धावा काढल्याने दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७७९ वर येऊन घसरले आहे. ऋषभ पंत ७६१ गुणांसह ८ व्या स्थानावर विराजमान आहे, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ७४८ गुणांसह ९ व्या स्थानावर विराजमान असून इंग्लंडचा बेन डकेट ७४७ गुणांसह १० व्या स्थानी आहे.