ICC Women's World Cup 2025: 'We have a chance to make history..', Harmanpreet Kaur made a big statement before the Women's World Cup
Statement by India captain Harmanpreet Kaur : महिला एकदिवसीय विश्वचषकाचा थरार ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाचे सामने भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहेत. यजमान म्हणून, भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची ही नामी संधी असल्याचे सत्य कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मान्य करण्यात आले आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हणाली आहे की, भारताचे विश्वचषकात नेतृत्व करताना तिच्याकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. ती म्हणाली मकी, “हा आपल्या सर्वांसाठी घरचा विश्वचषक आहे आणि आम्ही तो आमच्या सर्व समर्थकांसाठी खास बनवू इच्छित आहोत.” शनिवारी आयसीसीच्या एका स्तंभामध्ये हरमनप्रीत कौरने लिहिले की “घरच्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान असून आम्हाला ट्रॉफी जिंकण्याची आकांक्षा आहे. ही स्पर्धा संस्मरणीय बनवण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे प्रेरित आहोत.”
हेही वाचा : IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार ..
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने लिहिले की विश्वचषकासाठी आम्ही आमच्या तयारीचा प्रवास समृद्ध करत असून संघ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी देखील करत आहे. यामुळे आता आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची आमची इच्छा आधिक जागृत झाली आहे. आम्हाला मोठी झेप घ्यायची असून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे जेतेपद जिंकायचे आहे.
हरमनप्रीत कौर म्हणाली की, विश्वचषकाची स्पर्धा नेहमीप्रमाणेच कठीण आहे. परंतु, संघाला त्यांच्या कौशल्यांवर, तयारीवर आणि कोणत्याही आव्हानावर मात करण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. घरच्या मैदानावर तसेच बाहेरील मैदानावर अलिकडे आलेले निकाल यामुळे संघाला उत्साह मिळाला आहे. आम्ही विश्वचषकामध्ये ही गती कायम ठेवण्यास उत्सुक आहोत. आमच्या विश्वचषक संघात सर्व विभागांमध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असून खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.
स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतीका रावल, हरलीन देओल, रिचा घोष आणि उमा छेत्री यासारख्या प्रतिभावान फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजीमध्ये देखील तितकीच प्रभावी मंडळी आहे. रेणुका सिंग ठाकूर आणि अरुंधती रेड्डी यांच्यासह, युवा क्रांती गौड, एन. श्री चरणी आणि राधा यादव आहे. याव्यतिरिक्त, दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि अमनजोत कौर हे तीन अष्टपैलू खेळाडू देखील आहेत.
हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर
भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेत सहाय्यक कर्मचाऱ्यांची भूमिका आणि चाहत्यांचा उत्साह तसेच पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे देखील हरमनप्रीत कौरने नमूद केले आहे.