Asia cup 2025 final IND vs PAK : आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मधील शेवटचा सुपर ४ सामना काल श्रीलंका आणि भारत या दोन संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हर सामन्यात विजय मिळवला. यासह, भारताने स्पर्धेत सलग सहा सामने जिंकण्याचा मोठा कारनामा केला आहे. भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आशिया कप २०२५ मध्ये शानदार गोलंदाजी करताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने चरिथ असलंकाचा बळी घेऊन एक विकेट घेतली. या विकेटसह, कुलदीप यादव आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘आम्ही त्याच पद्धतीने खेळू…’, अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला सूर्याचा अनोख्या शैलीत इशारा..
श्रीलंकेविरुद्ध, कुलदीप यादवने चार षटकांत ३१ धावा देत एक बळी घेतला. आतापर्यंत या हंगामात कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत सहा सामन्यांत १३ विकेट चटकावल्या आहेत. यापूर्वी, अमजद जावेद १२ विकेटसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता, तर भुवनेश्वर कुमारने ११ विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवची आशिया कपमधील कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम रचला आहे.
आशिया कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर जमा आहे. मलिंगाने एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात एकत्रितपणे एकूण ३३ बळी टिपले आहेत. आता कुलदीप यादव ३२ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. जर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर तो मलिंगाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
कुलदीप यादव आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करत आहे, त्याची उत्कृष्ट गोलंदाजी पाकिस्तान संघासाठी डोकेदुखीचे कारण बनली आहे. आशिया कप २०२५ मध्ये कुलदीपने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३ आणि दुसऱ्या सामन्यात १ विकेट घेतली आहे. अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या कामगिरीमुळे विरोधी संघाचे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे.
फिरकीपटू कुलदीप यादव सातत्याने प्रभावी गोलंदाजी करत आहे त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. त्याच्या आगामी गोलंदाजीवरून चाहते आणि तज्ञांना सामन्याच्या निकालाबद्दल मोठ्या आशा लागून आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात कुलदीपची कामगिरी टीम इंडियासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.