Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Vijay Merchant Trophy : अबब! 3 धावांत चटकावले 8 बळी; विराज माहेश्वरीचा ऐतिहासिक विक्रम 

विदर्भाने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात चंदीगडचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आहे. या विजयात विराज माहेश्वरीच्या ऐतिहासिक घातक गोलंदाजीने मोठी भूमिका बजावली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 01, 2026 | 03:02 PM
Vijay Merchant Trophy: Wow! 8 wickets taken for just 3 runs; a historic record by Viraj Maheshwari.

Vijay Merchant Trophy: Wow! 8 wickets taken for just 3 runs; a historic record by Viraj Maheshwari.

Follow Us
Close
Follow Us:

Viraj Maheshwari’s historical record : विराज माहेश्वरीच्या ऐतिहासिक घातक गोलंदाजी आणि कर्णधार कुश शर्माच्या शानदार द्विशतकाच्या बळावर विदर्भाने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात चंदीगडचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह, विदर्भाने ३० गुणांसह एलिट ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवून बाद फेरीत एंट्री केली. ज्यामुळे विदर्भाच्या क्रिकेट चाहत्यांना नवीन वर्षाची एक अविस्मरणीय भेट मिळाली आहे.

हेही वाचा : क्रीडा क्षेत्रात भारतीय Gen.G चा जलवा! क्रिकेटपासून बुद्धिबळापर्यंत चमकले ‘हे’ तारे

कुशचे शानदार द्विशतक

कर्नाटकातील शिमोगा येथील केएससीए मैदानावर खेळवण्यात आलेल्या तीन दिवसीय सामन्यात, चंदीगडने पहिल्या डावात २३७ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, विदर्भाचा कर्णधार कुश शर्माने शानदार फलंदाजी करत द्विशतक ठोकले, तर ओम धोत्रेने अर्धशतक झळकावले. या खेळींमुळे, विदर्भाने ५ बाद ३४४ धावा करून आपला डाव घोषित केला आणि १०७ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली.

 विराज माहेश्वरीचा ऐसतिहासिक स्पेल

दुसऱ्या डावात चंदीगडने ३ बाद ६ अशी सुरुवात केली काहरी परंतु विदर्भाच्या गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज उभे राहू शकले नाहीत. विराज आणि रोनिक हेडाऊ यांच्या अचूक लाईन आणि लेंथमुळे फलंदाज चांगलेच अडचणीत आणले. संपूर्ण संघ फक्त ३१ धावांवर गारद झाला.

हेही वाचा : IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

कर्णधार यशजित सिंगने सर्वाधिक १० धावा केल्या, तर तीन फलंदाज त्यांचे खाते देखील उघडू शकले नाहीत. विराजने फक्त ३ धावांत ८ बळी टिपले. तर रोनिक हेडाऊने ६ धावांत २ बळी घेण्यात यश मिळवले. या दमदार कामगिरीसह, विदर्भाने एक डाव शिल्लक असताना ७६ धावांनी विजय  आपल्या नावे केले.

टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी एक महिना बाकी असताना अनेक संघ आपापल्या तयारीला लागले आहेत. सोशल मिडियावर संघाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर काही खेळाडू हे विश्वचषकासाठी मैदानावर सराव करताना देखील पाहायला मिळत आहेत.दरम्यान,  २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले असून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्यासह टिम डेव्हिड यांचाही समावेश आहे. दरम्यान, मिचेल ओवेन आणि बेन द्वारशियस यांना अंतिम १५ संघातून वगळण्यात आले.

Web Title: In the vijay merchant trophy viraj maheshwari took 8 wickets for 3 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 03:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.