
VHT 2025-26: CSK's fast bowler roared! He took 7 wickets and dismantled Himachal Pradesh; who is Ramakrishna Ghosh?
Ramkrishna Ghosh’s 7 wickets : बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सोमवारी महाराष्ट्राचा रामकृष्ण घोषने कहर केला. त्याने अद्याप आयपीएल सामना खेळलेला नसला तरी, त्याने आता २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या ग्रुप सी सामन्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर, हिमाचल प्रदेशविरुद्ध ९.४ षटके गोलंदाजी करत ३० धावा देऊन ७ विकेट्स घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीमुळे एकेकाळी मोठ्या धावसंख्येसाठी सज्ज असलेल्या हिमाचल प्रदेशचा ४९.४ षटकांत २७१ धावांच करू शकला, तथापी हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा : VHT 2025-26: वैभव सूर्यवंशी काही थांबेना! मेघालय विरुद्ध फक्त 10 चेंडूत फटकावल्या 31 धावा
हिमाचल प्रदेशने आह सामना ७ धावांनी जिंकला. २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्र फक्त ९ बाद २६४ धावाच करू शकला. हिमाचल प्रदेशकडून पुखराज मानने शतक झळकावले. त्याने १११ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांसह ११० धावांची शानदार खेळी केली. वैभव अरोराने देखील ३३ चेंडूत ४० धावांची महत्वाची खेळी केली. महाराष्ट्राकडून रामकृष्ण घोषने प्रतिस्पर्ध्याकडून सर्वाधिक ७ बळी टिपले. प्रदीप, राजवर्धन हंगेरगेकर आणि सत्यजित यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
धावांचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्राचा डाव शेवटच्या चेंडूवर २६४ धावांवर गारद झाला. महाराष्ट्राकडून संघाकडून अंकित बावणेने १२० चेंडूत ९७ धावांची खेळी केली. तर निखिल नाईकने ३९ धावा फटकावल्या. परंतु त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. प्रतिस्पर्ध्याकडून कर्णधार मृदुल सुरोच, रोहित कुमार आणि आर्यमन सिंग यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. तर वैभव अरोराने १ बळी घेतला.
२८ ऑगस्ट १९९७ रोजी नाशिक येथे जन्माला आलेल्या रामकृष्ण घोषला आयपीएल २०२५ च्या आधी चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी सीएसकेकडून लिलावात खेळाडूवर ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. सीएसकेने रामकृष्ण घोषला आयपीएल २०२६ साठी कायम ठेवले आहे. परंतु रामकृष्ण घोषने अद्याप आयपीएल लीगमध्ये एकही सामना खेळलेला नाही.
हेही वाचा : IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट
रामकृष्ण घोषने आतापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले असूनत्याने ३५.०० च्या सरासरीने २१ विकेट्स चटकावल्या आहेत. तर त्यांनी ७ लिस्ट-ए सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेण्याची किमया साधली नाही. त्यांनी ९ टी-२० सामन्यांमध्ये २ विकेट्स देखील घेतल्या आहेत. घोषने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३६.९१ च्या सरासरीने ४४३ धावा देखील काढल्या आहेत.