बीसीसीआयने आयोजित केलेल्या २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भने सौराष्ट्रला ३८ धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
विजय हजारे ट्रॉफीचा लीगचा टप्पा संपला आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. परंतु, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शेवटच्या सामन्यात इतिहास रचला आहे.
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने पंजाब संघाविरुद्ध खेळताना फक्त १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. यासह सरफराज खानने इतिहास घडवला आहे.
भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून यशस्वी पुनरागमन केले. जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करताना ८२ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
२०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या ग्रुप सी सामन्यात महाराष्ट्राकडून रामकृष्ण घोषने सवाई मानसिंग स्टेडियमवर, हिमाचल प्रदेशविरुद्ध ९.४ षटके गोलंदाजी करत ३० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या प्लेट ग्रुप सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. मेघालयविरुद्ध त्याने फक्त १० चेंडूत ३१ धावा फटकावल्या.
बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकवून विदर्भाचा विश्वासार्ह फलंदाज असणाऱ्या ध्रुव शौरीने इतिहास घडवला आहे.
कोहलीची विकेट घेतल्यानंतर विशाल जयस्वाल खूप आनंदी झाला. कोहलीकडून सामन्याच्या चेंडूवर सही मिळाल्याने आणि स्टार फलंदाजासोबत फोटो काढल्याने त्याचा आनंद आणखी वाढला.