
IND U19 vs AFG U19, U19 WC 2026: India's troubles increased! Faisal Shinwari's century in Harare.
IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध अफगाणिस्तान १९ वर्षांखालील सघ दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आमनेसामने आले आहेत. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत येत आहे. टॉस जिंकून अफगाणिस्तानच्या संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात ८६ चेंडूत १०० धावा केल्या आहेत. त्याच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तान सध्या ४३.४ षटकात २३७ केल्या आहेत. सध्या फैसल शिनोजादा १०३ धावा तर उझैरुल्ला नियाझाई ५६ धावांवर खेळत आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या या दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने चांगली सुरुवात केली. उस्मान सादात आणि खालिद अहमदझाई या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी ५३ धावांची सलामी भागीदारी रचली. नंतर खालिद अहमदझाई ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात फैसल शिनोजादा हा फलंदाज आला. त्यानंतर लगेचच उस्मान सादात ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र फैसल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई यांनी डाव सावरला. दरम्यान, फैसल शिनोजादाने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत १४ चौकार मारले. तसेच संघाला २३० च्या पुढे नेण्यास मदत केली. दरम्यान, त्याला साथ देणाऱ्या उझैरुल्ला नियाझाईने देखील शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या ४३.४ षटकात २३७ धावा झाल्या आहेत. फैसल शिनोजादा १०३ धावा तर उझैरुल्ला नियाझाई ५६ धावांवर खेळत आहे. भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कानिष्क चौहान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Faisal Khan steps up on the big stage as he brings up a superb century in the #U19WorldCup semi-final 🤩 Watch more action LIVE, broadcast details 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/Vl7uqiejPo — ICC (@ICC) February 4, 2026
भारत १९ वर्षांखालील संघ : आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ : उस्मान सादात, खालिद अहमदझाई, फैसल शिनोजादा, उझैरुल्ला नियाझाई, महबूब खान(यष्टीरक्षक/कर्णधार),, अझिझुल्लाह मियाखिल, अब्दुल अझीझ, खातीर स्टॅनिकझाई, रूहुल्ला अरब, नूरिस्तानी ओमरझाई, वाहिदुल्ला झदरन