फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या या स्पर्धेत पाच सामान्यांची या दोन्ही संघामध्ये मालिका होणार आहे. यामध्ये सध्या दुसरा सामना सुरु आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यांमध्ये २९५ धावांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात खराब सुरुवात केली होती परंतु त्यांनी गोलंदाजीमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये कमबॅक केला आणि सामना नावावर केला होता. भारताच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला झाला.
Joe Root : जागतिक क्रिकेटमध्ये जो रूटने वाजवली डंका! राहुल द्रविडच्या विक्रमाची केली बरोबरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून कॅप्टन रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये १८० धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ३३७ धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे मोठ्या धावांची आघाडी होती. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा टीम इंडियाच्या फलंदाजी निराश केले आणि भारताच्या संघाला फक्त १७५ धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना जिंकण्यासाठी १८ धावांची गरज होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३.२ षटकांमध्येच हे लक्ष्य पूर्ण केले आणि मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे.
Series level. One-all.
An emphatic victory for Australia in Adelaide #AUSvIND pic.twitter.com/oR8OqesU5O
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2024
ट्रॅव्हिस हेडचे शतक टीम इंडियाच्या विरुद्ध १४० धावांची खेळी भारताला महागात पडले. रोहित ब्रिगेडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त १९ धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पाठलाग यजमान ऑस्ट्रेलियाने ३.२ षटकांत सहज पार केला. भारतीय संघाने १२८/५ धावसंख्येसह तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली आणि ४७ धावा जोडल्यानंतर ५ विकेट गमावल्या. चार वर्षांपूर्वी ॲडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारताचा ८ विकेट्सनी पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघ ३६ धावांवर ऑल आऊट झाल्याने चांगलीच अडचणीत सापडला होता.
ट्रॅव्हिस हेडने वेळोवेळी भारताविरुद्ध खूप धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेडनेच ॲडलेड कसोटीत भारताला विजयापासून दूर नेले. इतर फलंदाज एकही धाव काढण्यासाठी संघर्ष करत असताना त्याने १४० धावांची शतकी खेळी खेळली. हेडचे शतक आणि मार्नस लॅबुशेनच्या ६४ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळवता आली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये भारताचा संघाला विजय मिळवणे गरजेचे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताच्या संघाला आगामी सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे.