IND Vs END: Opener Jack Crowley's flop show! Former England captain Vaughan advises to learn from Gill..
IND Vs END : भारत आणि इंग्लंड या दोन संघात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दूसरा कसोटी सामना भारताने जिंकला. ६ जुलैची रोजी भारतीय कसोटी संघाने एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम देखील केले आहेत. भारताकडून फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही शानदार कामगिरी बघायला मिळाली. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीवर मात्र सुपर फ्लॉप झाल्याचे दिसून आला. त्याच्या कामगिरीकडे बघून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने सलामीवीर जॅक क्रॉलीवर जोरदार टीका केली.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, सतत अपयशी ठरल्यानंतरही त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली हे त्याचे भाग्य आहे. तसेच क्रॉलीने भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या फलंदाजीच्या रणनीतीतून शिकावे आणि त्याचा खेळ सुधारावा, असा सल्लाही त्याने दिला.
हेही वाचा : Wimbledon 2025 : Novak Djokovic चा जलवा कायम! डे मिनौरचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी
वॉनने ‘द टेलिग्राफ’ मधील त्याच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, गेल्या काही वर्षांत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी चाहत्यांना निराश केले आहे. मीही यात सामील आहे, पण तो (क्रॉली) मला आठवणाऱ्या सर्वात निराशाजनक खेळाडूंपैकी एक आहे. मी जेव्हापासून इंग्लंड क्रिकेट जवळून पाहिले आहे, तेव्हापासून तो सतत अपयशी ठरल्यानंतरही इतके कसोटी सामने खेळण्याची संधी मिळालेला सर्वात भाग्यवान खेळाडू आहे. त्याने स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे की त्याने ५६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त पाच शतके झळकावली आहेत आणि त्याची सरासरी ३१ आहे.
हेही वाचा : अरेरे…सामना सोडून इकडे कुठे? मॅचला दोन दिवस शिल्लक असताना ऋषभ पंत पोहोचला विम्बल्डनला
त्याची ३०.३ ची सरासरी ही कसोटी इतिहासात २,५०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सर्व सलामीवीरांमध्ये सर्वात कमी आहे. क्रिकेटपटूपासून समालोचक बनलेल्या या खेळाडूने गिलचे उदाहरण देत म्हटले, बदल शक्य आहे. फक्त शुभमन गिलकडे पहा. या मालिकेपूर्वी त्याची सरासरी ३५ होती आणि आता आणखी चार डावांनंतर त्याची सरासरी ४२ आहे. त्याने त्याच्या मानसिकतेमुळे आणि रणनीतीमुळे हे केले आहे. त्याला कळले होते की तो एलबीडब्ल्यूला बळी पडू शकतो. त्याने त्याच्या बचावावर काम केले आणि आता निकाल सर्वांसमोर आहे.
दुसऱ्या कसोटीच्या विजयात भारतीय कर्णधार शुभमन गिलचा मोठा वाटा आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात दुहेरी शतक केले. त्याने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या होत्या. तोच फॉर्म कायम ठेवत त्याने दुसऱ्या डावात देखील शानदार फलंदाजीचा नमूना पेश करून शतक झळकावले. गिलने १२९ चेंडूत आपले शतके पूर्ण केले. त्याने १६२ चेंडूचा सामना करत १६१ धावांची खेळी केली. त्याच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध मोठी आघाडी मिळवली. परिणामी भारताने इंग्लंडवर धावांनी विजय साकार केला.