नोवाक जोकोविच(फोटो-सोशल मीडिया)
wimbledon 2025 : नोवाक जोकोविच विम्बल्डन २०२५ मध्ये शानदार कामगिरी करताना दिसत आहे. सर्बियाच्या या दिग्गज टेनिसपटूने ११ व्या मानांकित अॅलेक्स डी मायनरचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. हा सामना ७ जुलै रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात नोवाकने आपल्या अनुभवाची ताकद पणाला लावून उत्तम खेळ खेळला.
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा विम्बल्डन २०२५ मध्ये जेतेपद पटकवाण्याच्या दिशेने भरभक्कम वाटचाल सुरू केली आहे. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात त्याने अॅलेक्स डी मायनरला ३-१ च्या फरकाने पराभूत केले आहे. त्यानंतर त्याचे क्वार्टर फायनलमध्ये स्थान पक्के केले.
हेही वाचा : Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य
प्री-क्वार्टर फायनल सामन्यात नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा आपण एक दिग्गज टेनिसपटू असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. या सामन्यात जोकोविचची सुरुवात फारशी खास नव्हती. पहिल्या फेरीत तो १-६ ने पिछाडीवर होता. यानंतर, स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला होता. पण त्यानंतर या दिग्गज खेळाडूने असे काही पुनरागमन केले की त्याने सामना आपल्या खिशात टाकला आहे.
पुढील दोन सेटमध्ये जोकोविचने प्रतिस्पर्ध्याला पुनरागमन करण्याचा एक देखील चान्स दिला नाही. त्याने हा सेट ६-४, ६-४ असा जिंकला. अशाप्रकारे नोवाक जोकोविचने स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. आता तो त्याच्या कारकिर्दीत १६ व्यांदा क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. सध्या जोकोविच ३८ वर्षांचा आहे आणि तो जागतिक टेनिस रँकिंगमध्ये ६ व्या स्थानावर आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. जोकोविचच्या या शानदार विजयानंतर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर या दिग्गज खेळाडूच्या विजयाची स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत विराट कोहलीने लिहिले की ‘किती छान सामना होता. ग्लॅडिएटरसाठी नेहमीप्रमाणेच हे सोपे काम होते.’
हेही वाचा : RCB चा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणी वाढल्या, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकला! पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विम्बल्डन सामना बघण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी या टेनिस स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवली आहे. १० वर्षांपूर्वी देखील हे कपल टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी हजर राहिले होते.