Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 4th Test : ख्रिस वोक्सचा तो चेंडू की तोफेचा गोळा? बॅटवर आदळताच झाले दोन तुकडे, जयस्वाल चकित; बॅटचे पहा Video

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडला.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालच्या बॅटचे दोन तुकडे झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 23, 2025 | 08:45 PM
IND vs ENG 4th Test: Was that Chris Woakes ball or a cannonball? It broke into two pieces as soon as it hit the bat, Jaiswal was surprised; Watch the video of the bat

IND vs ENG 4th Test: Was that Chris Woakes ball or a cannonball? It broke into two pieces as soon as it hit the bat, Jaiswal was surprised; Watch the video of the bat

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ३ सामने खेळवण्यात आले आहेत. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताने या सामन्यात सावध फलंदाजीला सुरुवात केली होती. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. नंतर केएल राहुल ४६ धाव करून बाद झाला. तर यशस्वी जैयस्वाल ५८ धावा करून माघारी परतला. तत्पूर्वी या सामन्यात एक विचित्र प्रकार घडल्याचे दिसून आले.

मँचेस्टरच्या या सामन्यात यशस्वी जयस्वाल नेहमीपेक्षा सावध खेळताना दिसून आला. या दरम्यान 9व्या षटकात एक आश्चर्यकारक असा प्रकार घडला. या सर्व प्रकारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कारण यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले आहेत. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘असा’ योगायोग; तब्बल ९३ वर्षे आणि ५९२ सामन्यांनंतर..

नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूने खेळपट्टीवर चांगलीच उसळी घेतली. यानंतर हा चेंडू जाऊन थेट जयस्वालच्या बॅटच्या हँडलवर जाऊन आदळलाय. त्यामुळे बॅटचं हँडल तुटले. बॅट तुटल्याचं पाहून यशस्वी जयस्वाल काही क्षण बॅटकडे केवळ पाहतच राहिला. मैदानात उपस्थित खेळाडू, पंच आणि चाहते देखील हा प्राकार बघून आश्चर्यचकीत झाले होते. जयस्वालकडून बॅटची स्थिती पाहण्यात आली आणि त्याने बॅट बदलण्यासाठी डगआउटकडे इशारा केला. यानंतर करुण नायर ताबोडतोब मैदानात धाव घेत चार बॅट घेऊन आला. यापैकी एक बॅट जयस्वालने निवडली. ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Bat be like “mujhe kyun toda?” 😭🏏#ENGvIND 👉 4th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/0VxBWU8ocO pic.twitter.com/q80vIuwqIj — Star Sports (@StarSportsIndia) July 23, 2025

जयस्वालच्या बॅटची किमंत किती?

मिडिया रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वालच्या तुटलेल्या बॅटची किंमत ही 1 लाख रुपये इतकी आहे. बॅटची किंमत ऐकून क्रीडाप्रेमी आणि नेटकरी यांच्याकडून प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहेत. यामध्ये काही जणांकडून ख्रिस वोक्सची स्तुती करण्यात आली. तर काही जण यशस्वी जयस्वालच्या बचावात्मक शॉट्सचे कौतुक करताना दिसत आहेत. एक चाहत्याने लिहिलं आहे की, “जयस्वालची बॅट तर तुटली, पण उत्साह मात्र कायम आहे.”

सामन्याची स्थिती

दरम्यान, भारताच्या 3 विकेट्स गमावून १४८ धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १०७ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. त्याला लियाम डॉसनने बाद केले. त्याआधी केएल राहुल ४६ धावा करून माघारी गेला होता. त्याला क्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांनतर भारतीय कर्णधार शुभमन गिल १२ धावा करून झटपट आऊट झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. आता ५० ओव्हरचा खेळ झाला असुन मैदानावर साई सुदर्शन २४ आणि रिषभ पंत १ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा : IND vs ENG 4th Test : चौथ्या कसोटी सामन्यात KL Rahul ची मोठी कामगिरी; गावस्कर-तेंडुलकरच्या ‘या’ पंक्तीत मिळवलं स्थान…

Web Title: Ind vs eng 4th test chris woakes ball breaks jaiswals bat into two pieces watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाला नकार! भारतात परतताच जयस्वालच्या बॅटने ओकली आग; पाडला धावांचा पाऊस 
1

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाला नकार! भारतात परतताच जयस्वालच्या बॅटने ओकली आग; पाडला धावांचा पाऊस 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.