IND vs ENG: Shubman Gill doesn't give up on Kohli! He broke another record; Bhim performed a feat in the army countries..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामान्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या. तर त्याच्या प्रतिउत्तरात इंग्लंडने जो रूटच्या दीड शतक आणि बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद ६६९ धावांचा डोंगर उभा केला. यासह इंग्लंडने चौथ्या दिवशी ३११ धावांची आघाडी घेतली. प्रत्युउत्तरात भारताने २ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या आहेत. यामध्ये केएल राहुल ८७ तर कर्णधार शुभमन गिल ७८ धावांवरनाबाद आहेत. या दरम्यान भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने आणखी एका विक्रमला गवसणी घातली आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. गिल आता सेना देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. यासह, तो आणखी 8 धावा करताच सेना देशांमध्ये 700 धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे.
भारतचा कर्णधार शुभमन गिलने मँचेस्टर कसोटीत 74 धावा करताच विराट कोहलीच्या विक्रमाला मागे टाकले. सेना देशांमध्ये मालिकेत आशियाई फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा होता. त्याच वेळी, मँचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या 58 व्या षटकामध्ये गिलने विराट कोहलीला पिछाडीवर टाकले आहे. रूटच्या चेंडूवर चौकार मारून गिलने ही हा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test च्या चौथ्या दिवशी केले 5 विक्रम! गिल-राहुलसह स्टोक्स चमकला
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेमध्ये कोणत्याही आशियाई फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर नोंदवण्यात आला होता, त्याने २००६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांमध्ये ६३१ धावा फटकावल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी शुभमन गिलला चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फक्त १३ धावांची गरज होती आणि त्याने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात या धावा करून विक्रम केला आहे.
इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाकडून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर जमा आहे. त्याने २०२४ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाच सामन्यांमध्ये एकूण ७१२ धावा कुठल्या होत्या. जयस्वालचा विक्रम मोडण्यासाठी आणि नंबर १ स्थान मिळवण्यासाठी, गिलला सध्याच्या सामन्यात आणखी १७ धावांची आवश्यकता आहे.
हेही वाचा : IND vs ENG : करुण नायरला खराब फॉर्ममुळे नाही तर या कारणामुळे संघातून वगळलं! प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा