
फोटो सौजन्य – X (BCCI)
शुभमन गिलचे द्विशतक : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे यादरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड या पहिल्या कसोटी सामना दरम्यान झालेल्या पराभवानंतर भारताच्या संघाने दमदार कमबॅक या सामन्यात केला आहे. यामध्ये मोलाचे योगदान हे भारताचा कर्णधार शुभमन गिल याचे राहिले. त्याने टीम इंडियाला पाच विकेट्स गमावल्यानंतर अडचणीतून सावरलं आणि द्विशतक नावावर केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांची चांगली भागीदारी झाली होती.
दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सेशनच्या शेवटी रवींद्र जडेजाने विकेट गमावली. सुरू असलेल्या सामन्यांमध्ये दुसऱ्या सेशनमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने त्याच्या कॅप्टनसी मध्ये पहिले द्विशतक नावावर केले आहे. या द्विशतकासह शुभमन गिल याने इतिहासामध्ये नाव कोरले आहे. तो आता परदेशामध्ये द्विशतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. शुभमन गिल याने भारतीय संघासाठी 311 धावांमध्ये २०० धावा पूर्ण केल्या (Shubman Gill double century marathi news). यामध्ये त्याने दोन षटकार आणि 21 चौकार मारले. 64.31 च्या रेट ने या सामन्यात त्याने धावा केल्या.
IND VS ENG: शतक हुकलं पण मन जिंकलं ‘सर जडेजा’! टीम इंडियाला अडचणीतून काढलं
आत्तापर्यंत भारताच्या कोणत्याही कर्णधाराने इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावले नव्हते. शुभमन गिल हा भारताचा पहिला कर्णधार आहे ज्याने इंग्लंडमध्ये डबल सेंचुरी मारली. त्याच्या या खेळीने ड्रेसिंग रूममधून सर्व खेळाडूंनी त्यांचे कौतुक केले त्याच बरोबर स्टेडियम मध्ये असलेले सर्व चाहत्यांनी देखील उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले आणि भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले आहे.
Maiden DOUBLE-CENTURY for Shubman Gill in Test Cricket! 💯💯 What a knock from the #TeamIndia Captain! 🫡🫡 Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/JLxhmh0Xcs — BCCI (@BCCI) July 3, 2025
रोहित शर्माचा निवृत्तीनंतर शुभमन गिल याला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले त्यानंतर दुसरा पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भारताच्या कर्णधार पदावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उचलले जात होते. भारताचे युवा खेळाडूच्या हातामध्ये कॅप्टनची सोपवल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या त्यांनी टीका केली पण त्यांनी त्याच्या सातत्याने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीने सर्वांनाच उत्तर दिले आहे.
आतापर्यंत 123 धावांचा खेळ झाला आहे यामध्ये सध्या भारताच्या संघाने सहा विकेट्स गमावून 482 धावा केल्या आहेत टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार शुभमन गिल खेळत आहे. 123 धावांचा खेळ झाला आहे आणि पाचशे धावा पूर्ण व्हायला फक्त 18 धावा हव्या आहेत.