
Daryl Mitchell set a new record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेलने भरताविरुद्ध शतक झळकवले आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३३७ धावा उभ्या केल्या आहेत. त्याच्या या खेळीने त्याने इतिहास रचला आहे. तो भारतात भारतीय संघाविरुद्ध सलग पाच वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याची किमया साधली आहे. असे करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या डॅरिल मिशेलने इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध सलग पाच एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवला चौकार मारून डॅरिल मिशेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तेव्हा त्याने हा पराक्रम केला आहे. मिशेलने ५६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पुढे त्याने या सामन्यात शतक देखील पूर्ण केले. त्याने १०६ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. यासामन्यात त्याने १३१ चेंडूत १३७ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकार लगावले. भारतात भारतीय संघाविरुद्धच्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये मिशेलने १३०, १३४, ८४, १३१*, १३७ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, डॅरिल मिशेलने त्याच्या शेवटच्या सात एकदिवसीय डावांमध्ये सहा वेळा ५० पेक्षा जास्त धावा काढण्याची किमया साधली आहे.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेल-फिलिप्सचे वादळ! न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. इंदूरमध्ये या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर ३३८ धावा कराव्या लागणार आहे.