न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर ३३८ धावा कराव्या लागणार आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : “त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ५३ धावांवर त्यांनी आपले ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५ धावा करून बाद झाला, तर हेन्री निकोल्सला भोपळाही फोडता आला नाही. विल यंग ३० धावा करून बाद झाला. मात्र संघाच्या या पडझडीनंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमक हल्ला चढवत संघाचा डाव सांभाळला. या जोडीने भारतीय गोलंदाजांना एक देखील संधी न देता चौफेर फटकेबाजी सुरू ठेवली.
Innings Break! New Zealand post a formidable total of 337/8 in the series decider.#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned! Scorecard – https://t.co/Zm5KbOqvpl #TeamIndia #INDvNZ #3rdODI @IDFCfirstbank pic.twitter.com/bz6Zdlcqsw — BCCI (@BCCI) January 18, 2026
दरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. नंतर दोघांनी देखील शतके लागवली. डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठरले. डॅरिल मिचेल १३१ चेंडूत १३७ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. तर ग्लेन फिलिप्सने ८८ चेंडूत १०६ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकर आणि ३ षटकार लगावले. अर्शदीप सिंगने बाद केले. मिचेल हे २ धावा, झॅकेरिन फॉल्क्स १० धावा, ख्रिश्चन क्लार्क ११ धावा करून बाद झाले तर , मायकेल ब्रेसवेल २८ धावांवर तर काइल जेमिसन ० धावेवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क.






