इंदोरमध्ये डॅरिल मिचेलचे भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारताने बाजी मारली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडकडून चा संघ शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. दरम्यान डॅरिल मिचेलने या सामन्यात शतक लगावले आहे. डॅरिल मिचेलचे हे भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक झळकवले आहे. त्याने १०६ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा : “त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ५३ धावांवर त्यांनी आपले ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५ धावा करून बाद झाला, तर हेन्री निकोल्सला भोपळाही फोडता आला नाही. विल यंग ३० धावा करून बाद झाला. त्यामुळे गिलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसत असताना मात्र डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमक हल्ला चढवला. या जोडीने भारतीय गोलंदाजांना एक देखील संधी न देता चौफेर फटकेबाजी सुरू ठेवली.
दरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. नंतर हा जोर कायमच राहिला आणि डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठरले, या आधी त्याने राजकोट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ११७ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. आता डॅरिल मिचेल १२५ धावांवर खेळत आहे तर ग्लेन फिलिप्स ८६ धावांवर नाबाद आहे. अजून १० ओव्हर बाकी असून न्यूझीलंडच्या ३ बाद २५० धावा झाल्या आहेत. ही जोडी अशीच खेळत राहिली तर न्यूझीलंड संघ ३०० धावांच्या पुढे नक्की जाईल. भारताकडून हर्षित राणाने २ तर अर्शदीप सिंगने १ विकेट गहटली आहे.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क, जेडेन लेनोक्स.






