
IND vs NZ, 3rd ODI: Daryl Mitchell is on fire! After AB de Villiers, he is only the second batsman in the world to achieve 'this' feat in India.
Daryl Mitchell showcased his prowess in India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना इंदूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा उभ्या केल्या आहेत. या सामन्यात शतकवीर डॅरिल मिशेलने आणखीएका टप्प्याला गवसणी घातली आहे. त्याने शतक झळकवून ठोकून इतिहास रचला आहे. भारतात भारतीय संघाविरुद्ध किमान चार एकदिवसीय शतके ठोकणारा मिशेल जगातील दुसराच फलंदाज ठरला आहे.
रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय संघाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ३४ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज डॅरिल मिशेलने भारतात आठव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाविरुद्ध चौथे एकदिवसीय शतक झळकवले. डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठरले. डॅरिल मिचेल १३१ चेंडूत १३७ धावा करून बाद झाला.
डॅरिल मिशेलच्या आधी, ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने केली होती. एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी भारतीय संघाविरुद्ध भारतात ११ एकदिवसीय सामने खेळले आणि पाच शतके ठोकली. एकूण पाच फलंदाजांनी भारतात भारतीय संघाविरुद्ध तीन एकदिवसीय शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
मिशेलने भारतात भारतीय संघाविरुद्धच्या शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत. भारतात खेळलेल्या त्याच्या शेवटच्या पाच सामन्यांमध्ये, डॅरिल मिशेलने १३०, १३४, ८४, १३१ आणि १३७ धावा केल्या आहेत. यासह, तो भारतात भारतीय संघाविरुद्ध सलग पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेल-फिलिप्सचे वादळ! न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य
यासह, डॅरिल मिशेल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनला आहे. नॅथन अॅस्टलने भारताविरुद्ध न्यूझीलंडसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याची किमया साधली आहे. नॅथन अॅस्टलने त्याच्या खेळण्याच्या काळात पाच शतके लगावली होती. तर दुसरीकडे, डॅरिल मिशेलने ११ डावांमध्ये चार शतके झळकावून इतिहास घडवला आहे.