IND VS PAK: Boycott voices fade away! Rush for tickets for the championship match
IND VS PAK Asia cup 2025 final : आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान विजेतेपदासाठी समोरसमोर असणार आहेत. आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागून आहे. तसेच अनेकांनी बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली आहे. पण आता वातावरण पूर्णपणे बदलले आहे. तिकीट विक्रीचा आकडा याचा पुरावा आहे. लाखो रुपये खर्च करून देखील प्रेक्षक तिकिटे खरेदी करू शकत नाही आहेत. त्यांना तिकीट मिळणे देखील कठीण झाले आहे. चाहत्यांच्या या उत्साहामुळे हे सिद्ध होते की भारत-पाकिस्तान सामना हा केवळ एक खेळ नाही तर चाहत्यांसाठी उत्सवाचा मोठा क्षण आहे.
आज रविवार असल्याने, स्टेडियममध्ये सुमारे २८,००० प्रेक्षक बसण्याची शक्यता होती. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील स्काय बॉक्स लाउंजची किंमत ₹२ लाख, बाउंड्री लाउंज पॅकेज ₹१.५ लाख आणि ग्रँड लाउंज एक्सपिरीयन्सची किंमत ₹८८,००० होती. तरीही, सर्व तिकिटे विकली गेली आहेत. याचा सरल अर्थ असा की, प्रेक्षकांमध्ये सामन्याच्या थरारासाठी खूपच उत्सुकता आहे आणि तिकिटे विकताच स्टेडियम खचाखच भरून जाणार आहे. त्यामुळे बहिष्काराचा आवाज ओसरला असल्याचे दिसत आहे.
आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ स्पर्धेत दोनदा आमनेसामने असले असून भारताने दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता, अंतिम सामना हा दोन्ही संघांमधील तिसरा सामना असणार आहे. भारतीय संघ जेतेपदाचा मुख्य दावेदार मानले जात आहे.
तीन आठवड्यांत दोन्ही संघ आज अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दुबई स्टेडियम केवळ प्रेक्षकांच्या उपस्थितीचा विक्रमच रचणार नाही तर सामन्याचा उत्साह देखील शिगेला पोहोचेल. ही अंतिम लढाई केवळ क्रिकेटमधीलच नाही तर संपूर्ण आशिया कप २०२५ मधील सर्वात मोठी लढाई ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : BCCI कडून निवड समितीत मोठे बदल! प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.