
IND vs SA 2nd Test: Double blow to South Africa before Guwahati Test! 'Hey' star bowler injured; Read details
Two South African bowlers injured ahead of Guwahati Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळून झाला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ३० धावांची पराभव केला. आता दूसरा सामना दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतासाठी समस्या निर्माण झाली आहे, कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी पाहुण्या संघाला देखील मोठा झटका बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन आफ्रिकन गोलंदाज, सायमन हार्मर आणि मार्को जॉन्सन उपचार घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
हेही वाचा : IND W vs BAN W : भारतीय महिला संघाच्या डिसेंबर २०२५ च्या मालिकेत मोठा बदल! संपूर्ण दौरा आता अनिश्चित अवस्थेत
एका वृत्तानुसार, ऑफ स्पिनर सायमन हार्मर खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॉन्सन देखील जखमी झाला आहे. दोन्ही खेळाडू मंगळवारी कोलकात्यातील वुडलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले. जर मार्को जॉन्सन दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही, तर तो दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का असणार आहे. दुसऱ्या कसोटीत कागिसो रबाडाचा सहभागही संशयास्पद असल्याचे मानले अजत आहे. यामुळे पाहुण्या संघाला दुसऱ्या एका विशेषज्ञ वेगवान गोलंदाजाशिवाय खेळावे लागणार आहे.
जर सायमन हार्मर दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही तर भारतासाठी ही चांगली बातमी असणार आहे. कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात या फिरकी गोलंदाजाने महत्त्वाची भूमिका वठवली होती. सायमन हार्मर खांद्याच्या दुखापतीने ग्रस्त असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मागील सामन्यात सायमन हार्मरने सर्वाधिक षटके (२९.२) टाकली आणि अलिकडच्या काळात, पाकिस्तान दौऱ्यासह, त्याच्या कामाचा वाढता ताण या पराभवाचे कारण असण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून, ऑफ-स्पिनरने सहा डावांमध्ये १२१.३ षटके टाकली आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजचा पुढील सर्वोत्तम आकडा ७९.१ षटके आहे. दोन्ही खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळतील की नाही याबाबत अद्याप काही एक निश्चित नाही. जर दोघेही बाहेर पडले आणि रबाडा देखील तंदुरुस्त नसेल, तर आफ्रिकन संघाचे प्लेइंग इलेव्हन आव्हानात्मक असणार आहे.