भारतीय महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs BAN W : २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतपद मिळवल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाचा आगामी दौरा बांगलादेशात होता. या दौऱ्यादरम्यान, भारतीय महिला संघ बांगलादेश महिला संघाविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होती. परंतु, आता हा दौरा अनिश्चित अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता, बीसीसीआय मालिका पुढे ढकलण्यास अनिच्छुक असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे पुरुष संघाच्या मालिकेनंतर महिला संघाच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार
वृत्तानुसार, बीसीसीआयकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डला व्हाईट-बॉल मालिका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव देणारे औपचारिक पत्र पाठवण्यात आले आहे. बोर्डाने पत्रात कोणतेही अधिकृत कारण नमूद केलेले नाही, परंतु ESPNcricinfo असे सुचवते की बांगलादेशमधील दीर्घकाळापासून सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार या निर्णयामागील एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध अलिकडे तणावपूर्ण असल्याचे देखील देसत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे, सध्याचे सरकार भारतावर नाराज असल्याचे देखील वृत्त आहे. राजकीय आणि राजनैतिक परिस्थिती देखील दौऱ्याच्या निर्णयावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे.
२०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. बांगलादेशने या स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली होती. संघाने सातपैकी फक्त एक सामना जिंकला होता आणि पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
विश्वचषकानंतर, बीसीबीला आशा होती की भारत या वर्षाच्या अखेरीस नियोजित दौरा पार पडेल. मात्र, सध्याच्या परिस्थिती पाहता, बीसीबी याच्या बाजूने दिसत नाही. आता, बीसीबी सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय महिला संघ बांगलादेश दौरा करणार असल्याने त्यावर लक्ष ठेवून आहे. तथापि, बीसीबीकडून अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय?
तज्ज्ञांचे असे मत आहे की बांगलादेशातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत टीम इंडियाचा बांगलादेश दौरा नियोजित करणे कठीण होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आधीच अनेक परदेश दौरे पुढे ढकलले असून महिला संघाच्या दौऱ्याबाबत कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत.






