IND vs WI: KL Rahul sets a record by scoring a century! He surpassed England's 'this' batsman in this regard
KL Rahul sets a record by scoring a century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी केली आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धही शानदार शतक ठोकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एक नवा विक्रम स्थापन केला आहे. या दरम्यान त्याने इंग्लिश सलामीवीर बेन डकेटला मागे टाकले. केएल राहुलने इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी करत दोन शतके लागावली होती. आता, त्याने हीच लय कायम राखत अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक ठोकून इतिहास रचला आहे.
हेही वाचा : झिम्बाब्वे टी-२० विश्वचषकासाठी पात्र! केनियाच्या पदरी निराशा;आतापर्यंत ‘हे’ १७ संघ ठरले पात्र
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पुन्हा एकदा शानदार खेळी केली आणि दुसऱ्या दिवशी त्या खेळीचे शतकात रूपांतर केले. यासह, तो २०२५ मध्ये सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने आता इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटला पिछाडीवर टाकले आहे.
केएल राहुलने या वर्षी खेळलेल्या त्याच्या सातव्या सामन्यात ही किमया साधली आहे. या काळात त्याने ७ कसोटी सामन्यांमध्ये १३ डावांमध्ये ५०.९१ च्या सरासरीने ६१२* धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांच समावेश आहे. या यादीत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा : KL Rahul Century : क्लासी केएल…वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले शतक! भारताचा संघ मजबूत स्थितीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने आणखी एक टप्पा गाठला आहे. या वर्षी ६१२ धावा केल्याने, तो २०१७ च्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या त्याच्या विक्रमापासून फक्त काही धावांनीच दूर आहे. केएल राहुलने २०१७ मध्ये १४ डावांमध्ये ६३३ धावा फटकावल्या आहेत. २०१६ मध्ये त्याने ९ डावांमध्ये ५३९ धावा केल्या असून २०२४ मध्ये त्याने १६ डावांमध्ये ४९३ धावा काढल्या होत्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी केलीआहे . भारताच्या पहिल्या डावात त्याने पहिल्या दिवसाअखेर ५२ धावा करून तो नाबाद राहिला होता. राहुलने दुसऱ्या दिवशी त्याने आपले शतक साजरे केले. भारतात त्याने ९ वर्षानंतर शतक झळकवले आहे.