IND vs WI 3rd T20I Playing 11
पहिल्या सामन्यात संघाबाहेर बसवल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु, दुसऱ्या टी२० सामन्यातील संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीनंतर, या सामन्यात वैभव सूर्यवंशीचे स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात वैभव खेळणार का, याशिवाय आणखी कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.
इंदौरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता कमी आहे. संजू सॅमसन खराब फॉर्मशी झुंजत असून, त्याला दुसरा टी२० सामन्यात संघात स्थान टिकवून ठेवण्याची शेवटची संधी होती. त्याने सॅमसनने ४१ चेंडूंमध्ये ८२ धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. या कामगिरीमुळे सॅमसनची अंतिम ११ मधील जागा निश्चित आहे. त्यामुळे, वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे.
कुलदीप यादवने गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून, वरुण चक्रवर्तीच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. यामुळे , रवी बिश्नोईला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. आज त्याला संघाबाहेर बसवले जाऊ शकते. संघ व्यवस्थापनाने प्रिन्स यादवच्या आधी युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी दिली आणि त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये निराश केले नाही. म्हणून, प्रिन्सलाही आपल्या संधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.मागील दोन सामन्यांमध्ये नमन धीरला संधी देण्यात आली आहे. मात्र, इंदौरचे मैदान लहान आहे आणि खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे, नमनच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (क), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव






