IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा कस लागणार, 'दव' पुन्हा डोकेदुखी ठरणार? सौजन्य : एक्स
इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मालिकेतील (IND vs WI) तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने सर्वबाद बाद 224 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला दिले आहे. अभिषेक शर्मा (69) वगळता संघातील कोणालाच अर्धशतक गाठता आलं नाही, परिणामी पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय एकप्रकारे योग्य असाच ठरला.
मागील सामन्यातील वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म पाहता, भारतीय गोलंदाजांना टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे.
तसेच मैदानात पडलेला ‘दव’ (Dewdrop) हा पुन्हा क्षेत्ररक्षण करताना डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून भारताला चांगल्या गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणावरही पकड निर्माण करावी लागेल.
सलामीला आलेल्या अभिषेकने संजू सॅमसन (3)चा विकेट झटपट पडल्यानंतरही त्याचं ओझं आपल्या कामगिरीवर पडू दिलं नाही. त्यानं इशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. यातील 63 धावा या अभिषेकच्या होत्या. अभिषेकने 30 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तो शतक पूर्ण करेल असे वाटत असताना, शेमर स्प्रिंगरने आपल्याच गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले.
दरम्यान, या खेळीदरम्यान, अभिषेकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने आपली 33 वी धाव पूर्ण करताच हा विश्वविक्रम साधला. त्याने 1,024 चेंडूंमध्ये 2,000 धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंमध्ये 2,000 धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह, त्याने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम देखील मोडला.
मधल्या फळीतील इशान किशन (37) वगळता, कोणत्याच फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. 28 धावा करणारा तिलक वर्मा याला अपवाद वाटत असला तरी, तोही विचित्ररित्या धावचीत झाला. कर्णधार श्रेयस अय्यर (1) असो, नमन धीर (10) असो वा नितीशकुमार रेड्डी (21) स्वस्तात बाद झाले.
ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
भारताने पहिल्या इनिंगमध्ये या 223 धावांचा पल्ला जरी गाठला असला तरी, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर दबावतंत्र निर्माण केले होते. रोस्टन चेजने तर अय्यर व लयात आलेल्या इशान किशनचा विकेट मिळवला. रोस्टनने 38 धावांत 2 विकेट, तर शेमर स्प्रिंगरने 50 धावा देत 2 विकेट मिळवल्या. तर शेमर जोसेफ, किमो पाउल आणि गुडकेश मोती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.






