IND vs WI: Kuldeep Yadav's killer ball and Shai Hope's triple strike! Video goes viral
Kuldeep Yadav’s magical ball to Shai Hope : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिलं सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६२ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजलाला लवकर गुंडाळले. सिराजने ४ विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान कुलदीप यादवच्या जादुई चेंडूचे दर्शन घडले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चायनामन गोलंदाजाने कहर केला. कुलदीप यादवने वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपला अशा चेंडूने गोलंदाजी केली की चाहतेबघतच राहिले. हा कुलदीप यादवचा डावातील त्याचा पहिला बळी होता, परंतु त्याने होपला ज्या पद्धतीने माघारी पाठवले, ते पाहण्यालायक होते. या जादुई चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर
फिरकीपटू कुलदीप यादव भारतीय डावातील २४ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूने अचानक सामन्याचाच मार्ग बदलला. चेंडू खेळपट्टीवर येताच अचानक वळण घेऊन थेट स्टंपवर आदळला. शाई होपने ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला खरं परंतु चेंडूच्या हालचालीने त्याला पूर्णपणे चकित केले. परिणामी, त्याच्या यष्टी उधळल्या गेल्या आणि तो २६ धावांवर माघारी गेला.
Welcome back to Test cricket, @imkuldeep18! 💙 His first Test since October 2024 & Kuldeep cleans up Shai Hope just before Lunch! ☝ 🍽 LUNCH | WI 90/5 (23.2) Catch the LIVE action ➡ https://t.co/Ju76dqhTdq #INDvWI 1st Test, Day 1 👉 LIVE NOW on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/Qc7e3CIIis — Star Sports (@StarSportsIndia) October 2, 2025
वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या अचूक लाईन आणि लेंथसमोर दम धरु शकले नाही. पूर्ण संघ दुसऱ्या सत्रात देखील खेळू शकला नाही आणि फक्त १६२ धावांवर वेस्ट इंडिजचा डाव कोसळला. जस्टिन ग्रीव्हज हा ३० धावांचा टप्पा ओलांडणारा एकमेव फलंदाज ठरला. त्याने ४८ चेंडूत सर्वाधिक ३२ धावा केल्या, ज्यात त्याने ३ चौकार मारले. पण तोही जास्त काळ मैदानावर तग धरू शकला नाही.
भारतीय गोलंदाजांनी या वेस्ट इंडजिच्या पहिल्या डावात वर्चस्व गाजवले. मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी घेण्यात यश मिळवले, तर जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. तर, कुलदीप यादवने दोन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या आणि शेवटच्या फलंदाजाला बाद करून वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. तर वॉशिंग्टन सुंदरनेही एक बळी टिपला.
हेही वाचा : IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज