शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
शुभमन गिल डॉन ब्रॅडमनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याचे उद्दिष्ट ठेवतो: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डॉन ब्रॅडमनच्या प्रमुख विक्रमाशी बरोबरी करण्याची नामी संधी चालून आली आहे.
जर शुभमन गिलने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात ये असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २४६ धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून १००० कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील संयुक्त पहिला फलंदाज बनणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार म्हणून ब्रॅडमनला १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ११ डावांची आवश्यकता होती. दरम्यान, शुभमन गिलने भारताच्या कर्णधार म्हणून खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ७५४ धावा फटकावल्या आहेत.
याव्यतिरिक्त, शुभमन गिलला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्याची संधी देखील असणार आहे. आतापर्यंत त्याने ३७ सामन्यांमध्ये २६४७ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतच्या २७३१ धावांना मागे टाकण्यासाठी त्याला किमान ८५ धावांची आवश्यकता आहे. पायाच्या दुखापतीमुळे ऋषभ पंला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर राहावे लागले. ऋषभ पंतने WTC मध्ये एकूण ३८ सामने खेळले असून गिलने आतापर्यंत एकूण ३७ सामने खेळलेले आहेत.
जर शुभमन गिलकडून वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकण्यात आले तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १० शतके करणारा पहिला भारतीय फलंदाज देखील बनेल. सध्या, शुभमन गिलने ३७ सामन्यांमध्ये ९ शतके ठोकली असून ४० सामन्यांमध्ये ९ शतके करणाऱ्या रोहित शर्माच्या तो बरोबरी साधून आहे.
हेही वाचा : PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview
अहमदाबादमधील कसोटी सामन्यादरम्यान शुभमन गिलला आणखी एक मोठा कारनामा करण्याची संधी देखील असणार आहे. जर त्याने या सामन्यात ७ किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये किमान ५० षटकार मारणारा तिसरा भारतीय आणि जगातील फक्त चौथा क्रिकेटपटू बनणार. सध्या, गिलच्या नावावर WTC मध्ये ४३ षटकार जमा आहेत.