IND vs WI: Shai Hope scored a century, but an embarrassing record was lost; Read what exactly happened..
Shai Hope’s unwanted record : अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होपने शानदार शतक ठोकले. शाई होपला हे शतक येण्यासाठी तब्बल ५८ डावांची प्रतीक्षा करावी लागली. ज्यामुळे तो डावांच्या बाबतीत शेवटचा शतक झळकावणारा कॅरिबियन फलंदाज ठरला आहे.
शाई होपने ऑगस्ट २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती. तिसऱ्या डावात होप हा ९० धावांवर नाबाद राहिला पण त्याचे पुढचे शतक गाठता आले नव्हते. आता मात्र त्याला ५९ डावांची वाट पहावी लागली. जर्मेन ब्लॅकवुड या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. २०१५ मध्ये शतक झळकावणाऱ्या ब्लॅकवुडने ४७ डावांनंतर शतक झळकवले होते.
हेही वाचा : IND vs WI : सर जडेजाचा दिल्लीत धुमाकूळ! कपिल देवचा दिग्गज विक्रम मोडून रचला इतिहास; केला ‘हा’ पराक्रम
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रिस गेलने २००५ ते २००८ दरम्यान ४६ डाव खेळल्यानंतर त्याचे पुढचे कसोटी शतक लगावले होते. दरम्यान, ड्वेन ब्राव्होने २००५ ते २००९ दरम्यान ४४ डाव खेळून ही शतक झळकवण्याची कामगिरी केली होती. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. शिवनारायण चंद्रपॉलने १९९८ ते २००२ दरम्यान ४१ डाव खेळल्यानंतर शतक झळकावले होते. हा खेळाडू यादीत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेत आपला पहिला डाव ५ बाद ५१८ वर घोषित केला. सलामीवीर यशस्वी जयस्वालने १७५ धावा केल्या, तर कर्णधार शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला. जोमेल वॉरिकनने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात फक्त २४८ धावांवरच गडगडला. ज्यामुळे भारताला पहिल्या डावाच्या आधारे २७० धावांची आघाडी मिळाली आणि दुसऱ्या डावात पाहुण्या संघाला फॉलोऑन करावे लागले.
हेही वाचा : India vs West Indies 2nd Test : वेस्ट इंडिजचा जोरदार प्रतिकार! भारताला विजयासाठी 121 धावांची गरज
या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारताला १२१ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडी मैदानावर चांगली खेळत ७९ भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना झुजवले. अखेर सुंदरने जेडेन सील्सला बाद करत वेस्ट इंडिजची दुसऱ्या डाव समाप्त केला. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या चौथ्या दिवसाअखेर एक गडी बाद ६३ धावा केल्या आहेत. आता भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी ५८ धावांची गरज आहे.