रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)
Ravindra Jadeja’s record in IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडीमवर खेळला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने मोठा कारनामा केला आहे. जाडेजाएन चौथा बळी घेताच, भारतीय दिग्गजाने कपिल देवचा प्रतिष्ठित विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर जडेजाच्या एकूण ३३ कसोटी विकेट्स झाल्या आहेत. कपिल देव यांनी या मैदानावर ३२ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आता जाडेजाने हा विक्रम मोडला आहे.दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर नोंदवला गेला आहे. अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५८ बळी टिपले आहेत.
तर अश्विनने या मैदानावर ५ कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने या मैदानावर एकूण ५ कसोटी सामने खेळले असून कपिल देवने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ९ कसोटी सामन्यांमध्ये ३२ विकेट्स काढल्या आहेत.
तसेच रवींद्र जडेजा भारतात खेळताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज देखील ठरला आहे. असे करून जडेजाने हरभजन सिंगला पिछाडीवर टाकले आहे.
हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…
रवींद्र जडेजाने जॉन कॅम्पबेलला एलबीडब्ल्यू बाद करून माघारी पाठवले. कॅम्पबेलने शानदार शतक ठोकले. जॉन कॅम्पबेलने आपल्या खेळीत १९९ चेंडूंचा सामना करत ११५ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले. जॉन कॅम्पबेल २३ वर्षांत भारतात कसोटी शतक करणारा पहिला वेस्ट इंडिजचा सलामीवीर बनला आहे.