टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
India vs West Indies : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारताला १२१ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडी मैदानावर चांगली खेळत ७९ भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना झुजवले. अखेर सुंदरने जेडेन सील्सला बाद करत वेस्ट इंडिजची दुसऱ्या डाव समाप्त केला.
हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…
तत्पूर्वी भारताच्या ५ बाद ५१८ च्या प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज पहिल्या डावात २४८ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे भारताला फॉलोऑन करावा लागला. फॉलोऑन देण्यास सांगण्यात आल्यानंतर, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात जोरदार झुंज दिली. शाई होपने १०३ आणि जॉन कॅम्पबेलने ११५ धावा केल्या, ज्यामुळे वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाचा धोका टळला गेला. रोस्टन चेस ४०, टेग्नारिन चंद्रपॉल १०, अॅलिक अथानासे ७, टेविन इमलाच १२, खॅरी पियरे ०, जोमेल वॉरिकन ३, जोमेल वॉरिकन २ धावा करून बाद झाले तर जस्टिन ग्रीव्हजने नाबाद ५० धावा केल्या आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बूमराहने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर सिराजने दोन , तसेच जाडेजा आणि सुंदरने प्रत्येकी १ बळी घेतला.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
वेस्टइंडीज संघाची प्लेइंग इलेव्हन : रोस्टन चेस (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानासे, शाई होप, टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोमेल वॉरिकन,जेडेन सील्स