Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC World Cup Final 2025 : विजेता संघ होणार मालमाल! मिळणार विक्रमी बक्षिसे; उपविजेत्या संघाचीही लागणार लॉटरी 

भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाला विक्रिमी बक्षीस रक्कम मिळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 01, 2025 | 04:18 PM
ICC World Cup Final 2025: The winning team will be rich! Record prizes will be given; The runner-up team will also have to enter a lottery

ICC World Cup Final 2025: The winning team will be rich! Record prizes will be given; The runner-up team will also have to enter a lottery

Follow Us
Close
Follow Us:
  • विजेत्या संघाला मिळणार विक्रमी बक्षिस
  • भारतीय संघाने विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले
  • विजेत्या संघाला ₹३९.७० कोटी मिळणार

IND W vs SA W, ICC World Cup Final 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूल चारून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले नाही तर लाखोंची कमाई देखली मिळवली आहे.  ऑस्ट्रेलियाने दिलेले ३३९ धावांचे विक्रमी लक्ष्य गाठून विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाला अंदाजे ₹१९.८५ कोटी (अंदाजे ₹२० कोटी) बक्षिसे दिले जाणार आहे. तथापि, खेळाडू आता अंतिम सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत. जर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर त्यांना अंदाजे ₹३९.७० कोटी इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.

हेही वाचा : IND vs AUS : ‘हा विजय प्रत्येक भारतीय मुलीचे स्वप्न…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिलांच्या विजयावर तरुणांच्या प्रतिक्रिया

२०२५ च्या विश्वचषकातील विक्रमी बक्षिसे मिळणार

या वर्षी आयसीसीकडून महिला विश्वचषकाच्या बक्षिस रकमेत ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. एकूण $१३.८८ दशलक्ष (अंदाजे ११६ कोटी रुपये) बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे, जी मागील आवृत्तीपेक्षा सुमारे २९७% इतकी जास्त आहे. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम $३.५ दशलक्ष होती. महत्त्वाचे म्हणजे, पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धेत आता समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.  हा निर्णय आयसीसीच्या लिंग वेतन समानता धोरणाचा एक भाग असून ज्याचा उद्देश पुरुष आणि महिला खेळाडूंना समान आर्थिक सन्मान प्रदान करणे हा आहे.

विजेत्या आणि उपविजेत्या संघांना किती रक्कम मिळणार?

महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला $४.४८ दशलक्ष (अंदाजे ३९.७ कोटी रुपये) आणि उपविजेत्या संघाला $२.२४ दशलक्ष (अंदाजे १९.८ कोटी रुपये) मिळणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला $१.१२ दशलक्ष (अंदाजे ९.९ कोटी रुपये) देण्यात येणार आहे.

गट टप्प्यातील संघांसाठी खुशखबर

आयसीसीकडून हे देखील सुनिश्चित करण्यात आले आहे, की गट टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांनी रिकाम्या हाताने परत येऊ नये. त्यामुळे प्रत्येक सहभागी संघाला $250,000 (अंदाजे रु. 2.2 कोटी) मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, जिंकलेल्या प्रत्येक गट सामन्यासाठी $34,314 (अंदाजे रु. 28.8 लाख) बक्षीस दिले जाईल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना $700,000 (अंदाजे रु. 6.1 कोटी) आणि सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना $280,000 (अंदाजे रु. 2.4 कोटी) मिळणार आहेत.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाला नकार! भारतात परतताच जयस्वालच्या बॅटने ओकली आग; पाडला धावांचा पाऊस

या विश्वचषकाने केवळ भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली नाही तर महिला क्रिकेटच्या आर्थिक स्थितीला एक नवीन दिशा देखील प्रदान केली आहे.

Web Title: Ind w vs sa w the winning team will receive a record prize in the icc world cup final 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Icc women's world cup 2025

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण 
1

IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.