वर्ल्ड कपच्या काही दिवस आधीच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटमधून धावा निघत नाहीत, ही संघासाठी चिंतेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ती पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
आयसीसी महिला विश्वचषकाला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियासोबतएकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका कठीण परीक्षा असेल असे मुख्य कोच म्हणाले आहेत.
भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी आयसीसी महिला विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
माजी कर्णधार हीथर नाईट परतली आहे, जी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अनेक महिने बाहेर होती. नॅट सायव्हर-ब्रंट पहिल्यांदाच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.