शेफाली आणि स्मृतीचा खेळाचा धमाका (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शेफाली आणि मंधानाची स्फोटक सुरुवात, पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी
विजेतेपदाच्या सामन्यात भारताने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. डावाची सुरुवात करताना, शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोपून काढले आणि केवळ ९.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची स्फोटक भागीदारी रचली. शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत २९ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. जरी तिचे अर्धशतक केवळ दोन धावांनी हुकले असले तरी, तिने संघाला अंतिम सामन्यात आवश्यक असलेली स्फोटक सुरुवात करून दिली.
IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मंधानाचे ‘७९ धावांचे’ वादळ आणि ११,००० आंतरराष्ट्रीय धावांचा अफाट विक्रम
शफाली बाद झाल्यानंतरही स्मृती मंधानाची बॅट धडाकेबाजपणे फसत राहिली. मंधानाने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये १७५.५६ च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने ७९ धावांची एक अविस्मरणीय खेळी केली, ज्यात पाच चौकार आणि सात उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या ऐतिहासिक खेळीदरम्यान, स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. महिला क्रिकेटच्या इतिहासात हा जादुई टप्पा गाठणारी ती पहिली आणि एकमेव खेळाडू ठरली. या दोन स्टार सलामीवीरांच्या मदतीने भारताने श्रीलंकेसमोर सुवर्णपदक जिंकण्यासाठी २१६ धावांचे मोठे आव्हान ठेवले.
शेफालीच्या स्फोटक फॉर्मचा पुरावा
तिच्या शेवटच्या खेळीसह, शेफालीने तिच्या शेवटच्या पाच सामन्यांमध्ये ६४, ६८, ४०*, १००* आणि ४८ धावा केल्या आहेत. या धावा शेफालीचा अलीकडील फॉर्म दर्शवण्यासाठी पुरेशा आहेत. तथापि, या खेळींनी मिळवलेला पराक्रम खरोखरच अभूतपूर्व आहे, कारण ती एका कॅलेंडर वर्षात जगातील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. चला आता जाणून घेऊया की जगातील अव्वल पाच सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण आहेत.
महिला आशिया कप फायनलमध्ये भारत श्रीलंका येणार आमनेसामने! जेतेपदासाठी लढणार दोन्ही संघ
| धावा | फलंदाज | वर्ष |
| 863 | शेफाली वर्मा | २०२६ |
| ८२४ | लॉरा वुलवॉर्ड (दक्षिण आफ्रिका) | २०२६ |
| ८०० | नताशा माइल्स (हाँगकाँग | २०२६ |
| ७७९ | इशा ओझा (संयुक्त अरब अमिरात) | २०२५ |
| ७७९ | यास्मीन दासवानी (हाँगकाँग) | २०२६ |
शेफाली वर्माचे मागचे ५ खेळ
| धावा | चेंडू | स्पर्धा |
| ६४ | ४० | आशिया कप सेमीफायनल |
| ६८ | ३९ | आशिया कप फायनल |
| ४०* | १५ | आशिया खेळ क्वार्टर फायनल |
| १००* | ४९ | आशिया खेळ सेमीफायनल |
| ४८ | २९ | आशियाई खेळ फायनल |






