Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

Asian Games: ४x४०० मीटर मिक्स रिले शर्यतीत भारतीय संघाने अत्यंत थरारक आणि चुरशीच्या लढतीत रौप्यपदक पटकावले. अंतिम क्षणी वियतनामवर मिळवलेली अवघ्या ०.०८ सेकंदांची निसटती पण निर्णायक आघाडी भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचे कारण ठरली.  

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 09:23 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्समध्ये मिश्र ४x४०० रिलेमध्ये भारताने जिंकले रौप्यपदक
  • वियतनामला मागे टाकत भारतीय चौकडीचा दणदणीत पराक्रम
  • जपानमध्ये सुरू आहे एशियन गेम्स 2026 
Asian Games 2026: सध्या जपानमध्ये नागोया सिटी मिझुहो पार्क एथलेटिक स्टेडियमवर एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. आशियाई खेळ २०२६ मध्ये भारतीय एथलीट्सची शानदार घोडदौड कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी पार पडलेल्या ४x४०० मीटर मिक्स रिले शर्यतीत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे. केवळ 3 मिनिटे 14.46 सेकंदात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आहे.

भारताच्या या रौप्यपदकामध्ये मच्चेतिरा पूवम्मा, विशाल थेन्नारासू, रामराज विथ्या  आणि थेक्किनालिल मनू या चार खेळाडूंच्या चौकडीने मोलाचे योगदान दिले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या शर्यतीत अंतिम क्षणी वियतनामच्या धावपटूंना मागे टाकत भारतीय खेळाडूंनी दुसरे स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत बहरीनच्या संघाने ३:१२.८७ सेकंदाची वेळ नोंदवत नवीन ‘गेम्स रेकॉर्ड’सह गोल्ड मेडल जिंकले.

४x४०० मीटर मिक्स रिले शर्यतीत भारतीय संघाने अत्यंत थरारक आणि चुरशीच्या लढतीत रौप्यपदक पटकावले. अंतिम क्षणी वियतनामवर मिळवलेली अवघ्या ०.०८ सेकंदांची निसटती पण निर्णायक आघाडी भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचे कारण ठरली.  शर्यतीच्या सुरुवातीला मिळालेली ०.०८ सेकंदांची हीच छोटीशी आघाडी शेवटी सुवर्णसंधी ठरली आणि वियतनामला मागे टाकत भारताने फिनिशिंग लाईन दुसऱ्या क्रमांकावर पार केली.

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

भारतीय रिले संघाचा प्रमुख चेहरा असलेल्या विथ्या हिने यापूर्वी पेरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ४x४०० मीटर रिले प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या नेतृत्वात भारताने पदक जिंकले आहे. याशिवाय, तिने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिक्स ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि २०२३ च्या आशियाई खेळांमध्ये ४०० मीटर हर्डल्स मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका

जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी दाखवली आहे. आतापर्यंत 15 पेक्षा जास्त पदके भारताने जिंकली आहेत. त्यातच आता एथलीट्समध्ये देखील भारताने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. भारताची महिला धावपटू सीमा कुमारी हिने महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे.

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Web Title: India athletes team win mixed 4x400 meter silver medal asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Athletics
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल
1

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
2

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय
3

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
4

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.