Afghanistan defeats Japan in Asian Games
या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. केवळ १४ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. हसन इस्किल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर करीम जन्नत २१ धावांवर आणि मोहम्मद अक्रम ३४ धावांवर बाद झाले. अफगाणिस्तानने ६८ धावांत तीन विकेट्स गमावले. त्यानंतर कर्णधार दरवेश रसूलीने २९ धावा आणि मोहम्मद इशाकने २५ धावा करून संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. अफगाणिस्तानने २० षटकांत सहा विकेट्स गमावून १२९ धावा केल्या. जपानकडून शोमा सुगाया आणि इब्राहिम तकाहाशी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.
१३० धावांचे लक्ष्य गाठताना जपानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. शून्य धावसंख्येवरच त्यांनी पहिली विकेट गमावली. सलामीवीर लॅकलन यामामोतो-लेक एकही विकेट न घेता बाद झाला. त्यानंतर कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग १४ धावा करून स्वस्तात बाद झाला. ६० धावांवर असताना जपानला सलग तीन धक्के बसले. त्यांचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला. जपानचा संघ १९.३ षटकांत ८१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून अरब गुल मोमंदने चार, तर नांगेयालिया खरोटीने तीन विकेट्स घेतले. या विजयामुळे अफगाणिस्तानने दोन गुण मिळवले.
आशियाई क्रीडासाठी सहा संघांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये नेपाळ, अफगाणिस्तान आणि जपान या देशांचा समावेश आहे. तर, गट ‘ब’ मध्ये चीन, हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान या संघाचा समावेश आहे. यामधील दोन विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ त्यांच्या क्रमवारीनुसार आधीच या गटात आहेत.
IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण






